संसदेने बहुसंख्य हिंदु समाजाला त्याचे न्यायिक अधिकार देण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे !

‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’ची सांगता : देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हितरक्षणासाठी, तसेच हिंदु समाजाला त्याचे न्यायिक अधिकार देण्यासाठी संसदेने भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, असा एकमुखी ठराव उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशनाला उपस्थित ६७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला.

आज अयोध्या येथे उद्धव ठाकरे यांची सभा आणि विहिंपची धर्मसंसद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि त्यांची २५ नोव्हेंबरला होणारी सभा, तसेच विश्‍व हिंदु परिषदेची धर्मसंसद या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत तब्बल १० सहस्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे.

नवी मुंबईत हिंदूबहुल भागात मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी १४ हिंदूंची आत्मदहनाची चेतावणी

पोलिसांनी दिलेल्या खोट्या ‘ना हरकत’ अहवालाच्या आधारे सानपाडा येथे एका संस्थेला मशीद बांधण्यासाठी देण्यात आलेला भूखंड रहित करावा, यासाठी २७ नोव्हेंबर या दिवशी मोर्चा, मुंबई-पुणे महामार्गावर चक्का जाम, सामूहिक मुंडन यांसह १४ हिंदूंनी आत्मदहन करण्याची चेतावणी दिली आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणी एस्.आय.टी.कडून पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची चौकशी करणार्‍या विशेष तपासणी पथकाने येथील के.सी.ओ.सी.ए. (कोक्का) न्यायालयात २३ नोव्हेंबरला पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना दोषी ठरवणे अन्यायकारक ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक झालेल्यांपैकी कोणीही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे अधिकृत पदाधिकारी नसतांनाही विनाकारण संस्थेला या प्रकरणी गोवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

संस्कारांच्या माध्यमातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे हे आपले कर्तव्य ! – अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, श्री खंडेलवाल नवयुवक मित्र मंडळ, मुंबई.

आज आपल्या हिंदु समाजाला संस्कार शिकवण्याची आवश्यकता आहे. संस्कारांच्या माध्यमातून चांगल्या समाजाची निर्मिती होते़ आणि हे आपल्या सर्वांचे मुख्य कर्तव्य आहे.

समर्थन देणार्‍या आंदोलकांना मुख्यालयात प्रवेश दिल्याने सुरक्षा व्यवस्थेचे कंत्राट रहित !

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी आंदोलकांना महापालिका मुख्यालयात मुक्त प्रवेश दिल्यामुळे सुरक्षा मंडळाला दिलेले सुरक्षा व्यवस्थेचे कंत्राट रहित करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

वन अधिकार्‍यांना राख फासणार्‍यांचा वनरक्षकांकडून निषेध !

२ डिसेंबरपर्यंत दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर कामबंद आंदोलन करू, अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

दुधाचे दर वाढण्याची शक्यता

दूध उत्पादकांना अल्प दर मिळत असल्याने त्यांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने जुलै २०१८ मध्ये घेतला होता; परंतु त्याची नियमितपणे कार्यवाही होत नसल्याने अनुदान योजनेतून बाहेर पडण्याची चेतावणी दूध उत्पादकांनी दिली आहे.

गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट आयोजित बाणगंगा महाआरती संपन्न !

कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर कैवल्य मठाधीश श्री श्री श्री शिवानंद सरस्वतीस्वामी यांच्या वंदनीय उपस्थितीत वाळकेश्‍वर येथे बाणगंगा महाआरती २२ नोव्हेंबरला संपन्न झाली.


Multi Language |Offline reading | PDF