प्रयागराज महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीच्या समवेत संतसंघटनाचे विशाल कार्य करणार ! – प.पू. रामबालकदासजी महात्यागी महाराज

प्रयागराज येथे होणार्‍या महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीसमवेत तेथे आलेल्या संतांच्या संघटनाचे विशाल कार्य आम्ही करणार आहोत, असा मनोनिर्धार छत्तीसगड येथील पाटेश्‍वरधामचे पीठाधीश्‍वर प.पू. रामबालकदासजी महात्यागी महाराज यांनी व्यक्त केला.

(म्हणे) ‘मी ‘सनबर्न’ हे नाव प्रथमच ऐकत आहे !’ – चंद्रकात पाटील, महसूलमंत्री

सनबर्न फेस्टिव्हलविषयी ठाऊक नसल्याचे महसूलमंत्री सांगतात, तर पर्यटनमंत्र्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा असल्याचे सांगितले. सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मग हे सरकार मुके, आंधळे आणि बहिरे आहे का ? तसे नसेल, तर मग . . .

काश्मीरमधील अनंतनाग येथे ६ आतंकवादी ठार

अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे सैन्याने ६ आतंकवाद्यांना ठार मारले. सैन्याला बिजबेहरा येथे आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

बिडगाव (जळगाव) येथे ईदच्या मिरवणुकीनंतर दंगल

चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे ईदच्या मिरवणुकीच्या (संदलच्या) वेळी झेंडा फिरवण्यावरून वाद होऊन नंतर धर्मांधांनी हिंदूच्या घरावर आक्रमण करून दंगल केली. मिरवणूक संपल्यानंतर २५ ते ३० धर्मांधांनी घरात घुसून हिंदु महिलेचा विनयभंग केला

(म्हणे) ‘यहां श्रीराम का नारा दिया तो काट डालेंगे !’ – नालासोपारा येथे हिंदूंना धर्मांधांची धमकी

येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने २५  नोव्हेंबरला घेण्यात येणार्‍या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा दिया, तो काट डालेंगे’, अशी धमकी दिली.

हिंदूंच्या भावना एकवटल्याने श्रीराम मंदिर उभारणीच्या कार्याला वेग येईल !

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत आहे. हिंदूंचे दैवत असलेल्या प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमीत त्यांचे दर्शन घेण्यासाठी जातांना मी येथील पवित्र माती समवेत घेऊन जात आहे.

शबरीमला मंदिरात भाविकांना पूजेपासून रोखणार्‍या केरळ पोलिसांवर केरळ उच्च न्यायालयाचे ताशेरे

शबरीमला मंदिरात भाविकांना पूजेपासून रोखणार्‍या पोलिसांवर केरळ उच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले.

श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर ट्रस्टला गृहमंत्रालयाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस !

विदेशांतून मिळालेल्या निधीचा तपशील देण्याविषयी वारंवार स्मरणपत्रे देऊनही त्याकडे काणाडोळा केल्याच्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील १ सहस्र ७७५ संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.

एल्गार परिषदेसम पुण्यात होऊ घातलेल्या परिषदेमागील शक्तींची शासनाने चौकशी करून त्यावर नियंत्रण ठेवावे ! – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेला आमचा वैचारिक विरोध होता. त्या परिषदेतील वक्ते आणि विचार यांवर नियंत्रण असायला हवे, अशी आमची मागणी होती.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून सैनिकीतळावर आक्रमण !

आतंकवाद्यांकडून कुलगाममधील सैनिकीतळावर २२ नोव्हेंबरला सकाळी आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात एक स्थानिक नागरिक घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF