अंदमान येथे अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रचारकाची हत्या

अंदमान द्वीप येथील आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार (म्हणजेच धर्मांतर) करण्यासाठी गेलेल्या अमेरिकी धर्मप्रचारकाची हत्या करण्यात आली. जॉन एलन चौ असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून अंदमान येथील ७ जणांना अटक केली आहे.

कल्याण येथे धर्मांधांकडून होणारे धार्मिक पुस्तकांचे वाटप हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !

येथील पश्‍चिमेतील मुख्य बाजारपेठ परिसरात २० नोव्हेंबरला धर्मांधांकडून चालू असलेले एका धार्मिक पुस्तकाचे वाटप हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने प्रखर विरोध करत रोखले.

(म्हणे) ‘महाआरतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कारवाई करणार !’ – पोलीस निरीक्षक

महाआरतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कारवाई करणार असल्याची नोटीस सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांनी येथील रहिवाशांना बजावली आहे. सिडकोने अल्पसंख्यांक मुसलमान वस्तीत हिंदूंचा प्रचंड …..

केवळ कायद्याचे नाही, तर ‘न्यायाचे राज्य’ म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेश सरकारने शहरांना देण्यात आलेली मोगल आक्रमकांची नावे पालटण्यास आरंभ केला आहे; मात्र यामुळे पूर्णत: परिवर्तन होणार नाही. प्रत्येक व्यवस्थेत पालट होणे आवश्यक आहे. भारतात सध्या न्यायाचे नाही, तर कायद्याचे राज्य आहे.

आपल्याला हिंदु राष्ट्राचे भागीदार व्हायचे आहे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

आपत्काळाची ठिगणी पडलेली आहे. यापुढील काळात काय होईल, साधना करायला मिळेल कि नाही, ते सांगू शकत नाही. हिंदु राष्ट्रात गुरुकुलात संत बनवणारी शिक्षणपद्धतीच असेल.

आपल्यात साधकत्व निर्माण होण्यासाठी गुणांची जोपासना करा ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

आपल्याला ईश्‍वरप्राप्ती जलदगतीने करायची, असेल तर आपण साधक बनायला हवे आणि साधकत्वाचे गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहे. साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी साधना तळमळीने करणारा असतो.

आवरे, उरण (रायगड) येथे राष्ट्रजागृती सभा पार पडली !

हिंदु धर्मावर होणार्‍या विविध संकटांच्या विरोधात हिंदूंना जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवरे येथे हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक येथील भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव

नाशिक येथील भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF