मराठा समाजाच्या आरक्षणावरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ !

मराठा, धनगर, मुसलमान समाजाला आरक्षण देण्याच्या आणि दुष्काळाच्या सूत्रावरून विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्याने २० नोव्हेंबर या दिवशी विधानसभेचे कामकाज ३ वेळा काही कालावधीसाठी स्थगित, तर त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

गदारोळामुळे विधान परिषदेचेही कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

‘चर्चा नको, शेतकर्‍यांना साहाय्य घोषित करा’, ‘मराठा, मुसलमान आणि धनगर आरक्षण घोषित करा’, या मागण्यांंसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्यामुळे २ वेळा अर्ध्या घंट्यासाठी आणि त्यानंतरही विरोधकांनी गोंधळ चालू ठेवल्यामुळे दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

काश्मीरमध्ये ४ आतंकवादी ठार

शोपियां जिल्ह्यातील नंदीग्राम भागात २० नोव्हेंबरला सकाळी आतंकवादी आणि सुरक्षादलाचे सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीत सैनिकांनी ४ आतंकवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आले, तर २ जण घायाळ झाले……

शिर्डी देवस्थान आणि श्री सिद्धीविनायक मंदिर यांतील अपहाराविषयीची कागदपत्रे दिल्यास कारवाई करीन !

श्री शिर्डी देवस्थान आणि श्री सिद्धीविनायक मंदिर यांतील अपहाराविषयीची कागदपत्रे मला द्या. याविषयी मी कारवाई करतो, असे आश्‍वासनात्मक वक्तव्य विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले. २० नोव्हेंबर या दिवशी विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या ठिकाणी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी रणजीत पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी पाटील बोलत होते. 

पुलगाव (जिल्हा वर्धा) येथील शस्त्र भांडारात झालेल्या स्फोटात ६ जण ठार, १० घायाळ

येथून ८ कि.मी. अंतरावरील देवळी तालुक्यातील सोनेगाव परिसरात असणार्‍या लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटके निकामी करतांना भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून १० जण घायाळ झाले आहेत.

आजपासून वाराणसी येथे ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिदू अधिवेशन’ !

वाराणसी येथे २१ ते २४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत मधुबन लॉन, आशापुरा, वाराणसी येथे ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक ! – अमोल कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती 

हिंदु धर्मावर विविध मार्गांनी आघात होत असून देवतांचे विडंबन, संतांना अटक आणि त्यांच्यावर खोटे आरोप, बलपूर्वक धर्मांतर असे प्रकारही होत आहेत. हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून…..


Multi Language |Offline reading | PDF