हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी येथे २१ नोव्हेंबरपासून उत्तर अणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशन

भारत आणि नेपाळ येथील १२० हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणार !

कोरेगाव भीमा प्रकरणात नक्षलवाद्यांचे दिग्विजय सिंह यांच्याशी धागेदोरे असल्याचा संशय !

एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथेे झालेल्या हिंसाचार प्रकरणातील अन्वेषणात सापडलेल्या पत्रामध्ये नमूद केलेला भ्रमणभाष क्रमांक हा काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचाच असल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

अमेरिकेत नाईट क्लबमधील प्रसाधनगृहात हिंदु देवतांची चित्रे !

येथील एका नाईट क्लबमधील अतीमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या प्रसाधनगृहातील भिंतींवर श्री सरस्वतीदेवी, श्री दुर्गादेवी, श्री कालीमाता, भगवान शिव आणि श्री गणेश या देवतांची चित्रे लावून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

अलीगड मुस्लिम विद्यापिठातील नकाशात काश्मीर स्वतंत्र, तर अरुणाचल प्रदेश चीनमध्ये !

अलीगड मुस्लिम विद्यापिठात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या एका फलकावर भारताचा नकाशा दाखवण्यात आला असून त्यात काश्मीर स्वतंत्र दाखवण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर अरुणाचल प्रदेशही चीनमध्ये दाखवण्यात आला आहे.

आरक्षण आणि दुष्काळग्रस्तांना अर्थसाहाय्य या मागण्यांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुसलमान, धनगर आणि लिंगायत यांना याच अधिवेशनात आरक्षण मिळावे, शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, तसेच दुष्काळग्रस्तांना अर्थसाहाय्य करावे, या मागण्यांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

(म्हणे) ‘निरंकारी भवनावरील आक्रमणात सैन्यप्रमुखांचा हात असू शकतो !’

निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड आक्रमणात सैन्यप्रमुखांचा हात असू शकतो, असे देशद्रोही विधान आम आदमी पक्षाचे आमदार एच्.एस्. फुलका यांनी केले. ‘स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी सैन्यप्रमुखांनीच हे आक्रमण घडवून आणले असावे, असेही असू शकते’, असेही ते म्हणाले.

शबरीमला प्रकरणी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर भाविकांचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला असल्यामुळे भाविकांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

ताजमहाल हे हिंदू भवन ! – अमेरिकेतील पुरातत्ववेत्ते प्राध्यापक मर्विन मिल्स यांच्या शोधनिबंधातील निष्कर्ष

ताजमहालमध्ये नुकतेच एका मुसलमान व्यक्तीने नमाजपठण केल्यानंतर ‘ती ही हिंदूंची वास्तू आहे कि मुसलमानांची ?’, यावर पुन्हा वाद चालू झाला आहे.

आश्रयगृहातील मुलींना दिले जात होते अमली पदार्थ !

येथील मां विध्यवासिनी महिला आणि बालिका आश्रयगृहातील मुलींचा वेश्याव्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे उघड झाल्यानंतर तेथील मुलींना अमली पदार्थ दिले जात होते, असेही उघड झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF