आंध्रप्रदेशनंतर आता बंगालमध्येही सी.बी.आय.ला मुक्त प्रवेशास बंदी !

भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून केंद्रीय अन्वेषण विभागातील (‘सी.बी.आय.’तील) वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये चालू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे कारण पुढे करत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने त्यांच्या राज्यात सी.बी.आय.च्या मुक्त प्रवेशावर बंदी …….

सी.बी.आय.ने जप्त केलेल्या पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध नाही !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित सचिन अंधुरे यांच्या मेहुण्याचा मित्र रोहित रेगे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध नाही. गुजरात शस्त्र पडताळणी प्रयोगशाळेतील या पिस्तुलाविषयी ….

लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याच्या मागणीसाठी गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील यति नरसिंहानंद सरस्वती यांचे आमरण उपोषण

लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याच्या मागणीसाठी ‘अखिल भारतीय संत परिषदे’चे संयोजक यति नरसिंहानंद सरस्वती यांनी १ नोव्हेंबरपासून डासना येथील चंडीदेवीच्या मंदिरात आमरण उपोषण चालू केले आहे.

उद्यापासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ !

मुंबई येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला १९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रविवार, गुरुनानक जयंती आणि ईदची सुट्टी वगळता अधिवेशनाचे कामकाज केवळ ८ दिवस होणार आहे.

‘द क्विंट’ या संकेतस्थळाचे संपादकीय प्रतिनिधी, मालक, संपादकीय संचालक आणि वरिष्ठ संपादक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘द क्विंट’ या वृत्त  संकेतस्थळावर  १२ एप्रिल २०१८ या दिवशी  ‘The Sanatan Sanstha : Of Spirituality and Pseudo-Science’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी करण्यात आली.

देशाची अखंडता राखण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ व्हायलाच हवा !

अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक यति नरसिंहानंद सरस्वती देशामध्ये ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या राष्ट्ररक्षणार्थ आरंभलेल्या या चळवळीला हिंदु जनजागृती समितीचा पाठिंबा आहे.

सनातनवर बंदी आणण्यासाठी सक्रीय असणार्‍या मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांविषयी सतर्कता बाळगा !

सनातन संस्थेवर बंदी यावी, यासाठी विविध अन्वेषण यंत्रणा, राजकीय नेते, सनातनद्वेष्टे आणि तथाकथित पुरोगामी आकाश-पाताळ एक करत आहेत. याचसमवेत सर्वत्रच्या मोठ्या हिंदुत्ववादी संघटनाही सनातनवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे अनेक हिंदुत्वनिष्ठांकडून समजत आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘भूमी आणि पर्यावरण यांवर मानवाचा सूक्ष्म प्रभाव’ या विषयावर आध्यात्मिक शोधप्रबंध सादर

‘आध्यात्मिक आणि सूक्ष्म पैलू लक्षात न घेता भूमीचे परीक्षण केल्यास आपण परीक्षणात लक्षात घ्यावयाच्या ५० टक्के सूत्रांपासून वंचित रहातो.

येत्या साडेसहा मासांत अध्यादेश काढून राममंदिराला प्रारंभ होईल ! – सुरेंद्र जैन, सहमंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भाजप राम मंदिर बांधेल, असा आम्हाला विश्‍वास आहे. तुम्ही गेलेली साडेचार वर्षे पहात आहात, तर आम्ही राहिलेले साडेसहा मास पहात आहोत. येत्या साडेसहा मासांत अध्यादेश काढून राम मंदिर बांधण्यात येईल, असा विश्‍वास विश्‍व हिंदू परिषदेचे सहमंत्री श्री. सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केला.

वसई भूमीअभिलेख कार्यालयातील लाचखोर सर्वेक्षण अधिकारी अटकेत

तक्रारदाराचे ६ अनधिकृत गाळे निष्कासित न करण्यासाठी वसई येथील भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी दिनेश नारायण पष्टे (वय ५० वर्षे) यांनी ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.


Multi Language |Offline reading | PDF