भाजप सरकार देवस्थानांचा निधी चारा छावण्यांसाठी देणार !

काँग्रेस शासनाच्या काळात चारा छावणीच्या नावाखाली राज्यात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर असतांना त्या वेळी कारवाईची मागणी करणार्‍या भाजपने आता सत्तेवर आल्यावर मात्र धार्मिक संस्था आणि देवस्थाने यांचा निधी दुष्काळी भागांत चारा छावण्या उभारण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळ येथील ननवर बलात्कार करणार्‍या बिशपला धडा शिकवण्याचे धैर्य तृप्ती देसाई यांनी दाखवावे ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

तृप्ती देसाई या स्वतःला कायदा मानणार्‍या आणि देवाचे भक्त म्हणवतात; हा सर्वांत मोठा विनोद आहे. ज्या तृप्ती देसाई संविधानाचा आदर करण्याच्या गप्पा मारतात, त्याच मंदिराच्या विश्‍वस्तांना चोप देऊ, अशा घोषणा करतात.

पंजाबमध्ये ‘जैश-ए-महंमद’चे ७ आतंकवादी घुसले : अतीदक्षतेची चेतावणी

पंजाबमध्ये ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ७ आतंकवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. हे आतंकवादी देहलीच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाला मिळाली.

राममंदिरासाठी विहिंप धर्मसभांचे आयोजन करणार !

सरकार आणि न्यायालय यांच्यापर्यंत हिंदूंच्या भावना पोहोचवण्यासाठी विहिंपकडून धर्मसभांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी दिली.

एस्.आय.टी.कडून संशयित आरोपी अमोल काळे यांना अटक आणि ७ दिवसांची पोलीस कोठडी

अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील पुणे येथील संशयित आरोपी श्री. अमोल काळे यांना येथील विशेष अन्वेषण पथकाने (एस्.आय.टी.ने) कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केली.

कल्याण येथे हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंच्या धर्मांतराचा छुपा उद्देश असणारा कार्यक्रम अखेर रहित !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘सिटी ऑफ होप’ प्रस्तूत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या निमित्त ‘राष्ट्रीय बाळदिन महोत्सवा’चे १४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात येणार होते.

भारतमातेचा जयजयकार करण्यास नकार देणार्‍या ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी ! – आमदार टी. राजासिंह

ओवैसी हे अनेकदा जाहीर सभांमधून ‘मी भारतमाता की जय म्हणणार नाही’, असे विधान करतात.

संगीत साधना करणार्‍या कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

विविध गुण आणि कौशल्य यांच्या आधारे ‘स्व’ला ईश्‍वरचरणी अर्पण करण्याचा मार्ग म्हणजे ‘कला’ ! १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्‍वाला दिलेली अनमोल देणगी आहे.

(म्हणे) ‘शहरांची नावे पालटल्याने बेरोजगारीची समस्या सुटणार आहे का ?’- शरद पवार

शहरांची नावे पालटल्याने बेरोजगारीची समस्या सुटणार आहे का? देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यावरील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF