भाजपशासित हरियाणातील बाबा गोरखनाथ मंदिराच्या महंतांची निर्घृण हत्या

येथील बाबा गोरखनाथ मंदिराचे महंत विजय (वय ५० वर्षे) यांची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी एक व्यक्ती झज्जर-बादली या रस्त्यावरून जात असतांना ……

पाकच्या कुरापती चालूच : सीमेवर आणखी १ सैनिक हुतात्मा

पाकिस्तानी सैनिकांच्या जम्मू-काश्मीरमधील नियंत्रणरेषेवरील कुरघोड्या चालूच आहेत. जम्मू येथे पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात १ सैनिक हुतात्मा, तर १ सैनिक घायाळ झाला. गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत…..

(म्हणे) ‘संघ आतंकवादाचे प्रतीक आहे !’ – काँग्रेसचे आमदार सुंदरलाल तिवारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. संघ धार्मिकतेच्या आधारावर देशात द्वेष पसरवत आहे. धर्माच्या नावाखाली ते लोकांच्या भावना भडकवत आहेत. त्यांनी कधीही भारतीय ध्वज फडकावलेला नाही.

शबरीमला प्रकरणी पुनर्विचार याचिकांवर २२ जानेवारीला सुनावणी

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी करणार्‍या तब्बल ४८ पुनर्विचार याचिका प्रविष्ट झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर २२ जानेवारी २०१९ या दिवशी सुनावणी होणार आहे.

संशयितांच्या विरोधात ‘युएपीए’ अंतर्गत गुन्हे प्रविष्ट करण्यासाठी मुदतवाढ द्या ! – केंद्रीय अन्वेषण विभाग

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयितांवर अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीएच्या अंतर्गत) गुन्हे प्रविष्ट करण्यासाठी संमती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) न्यायालयात ….

राफेलच्या निर्मितीसाठी आम्हीच अनिल अंबानी यांच्या आस्थापनाची निवड केली !

राफेल विमानांच्या निर्मितीसाठी अनिल अंबानी यांच्या आस्थापनाची निवड करण्याचा निर्णय आमचाच होता, असे उत्तर ‘दसॉल्ट’ या आस्थापनाचे विशेष कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना दिले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान

जगदलपूर (छत्तीसगड) येथील जाहीर सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात निखालस खोटे आणि अपकीर्तीकारक वक्तव्य केले. या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर….

शोषित आणि वंचित यांसाठी काम करत असल्याचे भासवून प्रतिष्ठित व्यक्तीचा मुखवटा धारण करून नक्षलवाद चालू ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक

सार्वजनिक सभा घेण्यासारखे कार्यक्रम करून शहरी नक्षलवाद करणारे स्वत:चा एक मुखवटा सिद्ध करतात. यामध्ये अधिवक्ता, आधुनिक वैद्य असू शकतील.


Multi Language |Offline reading | PDF