पाकचे १६० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत !

जम्मू-काश्मीर राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असून त्याचा अपलाभ उठवत नियंत्रणरेषेजवळ पाकचे १६० आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत आहेत, अशी माहिती सैन्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

नक्षलवाद्यांना २८ वर्षे शस्त्रे पुरवणार्‍या संशयितास अटक

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्याचा संशय असलेल्या अजित रॉय नावाच्या व्यक्तीला देहली पोलिसांच्या विशेष शाखेने नुकतीच अटक केली आहे. गेल्या २८ वर्षांपासून रॉय हे नक्षलवाद्यांना शस्त्रे पुरवत होते

रामजन्मभूमीच्या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अखिल भारतीय हिंदू महासभेने ‘या खटल्याची सुनावणी तातडीने करण्यात यावी’, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली.

दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांकडून ‘आयईडी’चा स्फोट

दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी ‘आयईडी’चा स्फोट घडवून आणला. तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला. सुदैवाने यात कोणीही घायाळ झाले नाही.

उमेदवारांनी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध न केल्यास कारवाई करू ! – निवडणूक आयोग

निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे किंवा दूरचित्रवाहिनी यांच्या माध्यमातून प्रसिद्ध न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याविषयी कारवाई करण्यात येईल, असे निर्देश निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिले.

केंद्रीय दक्षता आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

सी.बी.आय.च्या (केंद्रीय अन्वेषण विभागाच्या) वरिष्ठ अधिकार्‍यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या प्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाने १२ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात एका बंद पाकिटात स्वतःचा अहवाल सादर केला.

उत्तरप्रदेश सरकार अयोध्येत मद्य आणि मांस यांवर बंदी घालण्याच्या सिद्धतेत

अयोध्येतील आणि अन्य ठिकाणच्या साधू-संतांनी केलेल्या मागणीनुसार अयोध्या शहराप्रमाणे अयोध्या जिल्ह्यातही मद्य अन् मांस यांवर बंदी घालण्याचा विचार उत्तरप्रदेश सरकार करत आहे. या संदर्भात उत्तरप्रदेश सरकारने कायदा विभागाचे मत मागवले आहे.

सरकारकडून देशातील २५ शहरे आणि गावे यांची नावे पालटण्याविषयीचे प्रस्ताव मान्य !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या १ वर्षात अनुमाने २५ शहरे आणि गावे यांची नावे पालटण्याचे प्रस्ताव मान्य केले आहेत. यामध्ये अलाहाबाद, फैजाबाद या दोन्ही शहरांचाही समावेश होता.

भारतातील सायबर आक्रमणांत वाढ : ६ मासांत अनुमाने ६ लाख ९५ सहस्र गुन्हे घडले !

भारतातील सायबर आक्रमणांत वाढ झाली असून जानेवारी ते जून २०१८ या ६ मासांच्या कालावधीत भारतात सायबर आक्रमणाचे अनुमाने ६ लाख ९५ सहस्र गुन्हे घडले आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षेविषयी ‘एफ् सेक्युअर’ या संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे.

लग्नात मामाने भाचीला उचलणे इस्लामविरोधी ! – ‘दारुल उलूम देवबंद’चा नवा फतवा

लग्नसमारंभात मामाने भाचीला उचलण्याची प्रथा इस्लामविरोधी आहे, असा फतवा ‘दारुल उलूम देवबंद’ने काढला केला आहे. या फतव्यात म्हटले आहे की, एक महिला आणि तिचा मामा यांच्यामधील नाते पवित्र असते


Multi Language |Offline reading | PDF