(म्हणे) ‘मध्यप्रदेशमध्ये सत्ता आल्यास सरकारी इमारतींत संघ शाखांवर बंदी घालणार !’ – काँग्रेसचे हिंदुद्वेषी ‘वचन’

मध्यप्रदेशमध्ये निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आल्यास सरकारी इमारतींत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर बंदी घालू, असे ‘वचन’ काँग्रेसने मध्यप्रदेशमधील जनतेला दिले.

छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून तब्बल ६ बॉम्बस्फोट : १ सैनिक हुतात्मा

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या गस्तीपथकावर आक्रमण केले.

जेवर (उत्तरप्रदेश) येथील २०० वर्षे प्राचीन मंदिरातील श्रीराम आणि सीता यांच्या मूर्तींची दिवाळीच्या दिवशी तोडफोड

जेवर (उत्तरप्रदेश) येथील नगला गणेशी गावाजवळ असणार्‍या २०० वर्षे जुन्या मंदिरातील प्रभु श्रीराम आणि सीता यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून दिवाळीच्या दिवशीच तोडफोड करण्यात आली.

काँग्रेस रामाच्या बाजूने आहे कि बाबरच्या, हे त्यांनी स्पष्ट करावे ! – योगी आदित्यनाथ

काँग्रेसलाच अयोध्येत राममंदिर नको आहे. काँग्रेसने ते प्रभु श्रीरामाच्या बाजूने आहेत कि मोगल आक्रमक बाबरच्या बाजूने आहेत, हे एकदा स्पष्ट करावे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केले.

पंढरपूर येथील भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद

भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी अतीमहनीय (व्हीआयपी) दर्शनाच्या मागणीवरून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याने मंदिर समितीचे कर्मचारी अशोक वाघमारे त्यांच्या तक्रारीवरून वाईकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना धक्काबुक्की आणि घागरी भिरकावल्या !

वर्ष २०१५ पासून चिकोत्रा नदीत मिसळणार्‍या सरसेनापती संताजी घोरपडे खासगी साखर कारखान्याच्या दूषित पाण्याविषयी वारंवार निवेदने देऊनही याविषयी कोणतीच कार्यवाही न झाल्याने काळम्मा बेलेवाडी गावातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना धक्काबुक्की करत प्रश्‍नांची सरबत्ती केली.

राममंदिर होण्यासाठी नागपूर येथे हिंदु संघटना २५ नोव्हेंबरला ‘हुंकार फेरी’ काढणार !

राममंदिरासाठी पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्यानंतर आता या आंदोलनासाठी मोर्चेबांधणीही चालू झाली आहे. १० नोव्हेंबरला सकाळी येथील संघ मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ३ साधिका जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

येथील सनातनच्या आश्रमातील सौ. संध्या जामदार (वय ६५ वर्षे), श्रीमती अनुराधा मुळ्ये (वय ५८ वर्षे) आणि सौ. जया साळोखे (वय ३६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात घोषित केले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधिकांविषयी त्यांचे कुटुंबीय, तसेच संत यांनी सांगितलेली सूत्रे

काकू पुष्कळ झोकून देऊन सेवा करतात. काकू करत असलेली सेवा आत्मविश्‍वास आणि प्रेरणा जागृत करणारी आहे. त्यांची प्रगती झाल्याचे ऐकून मला अतीव आनंद झाला. प्रतिक्रियाविरहीत सेवा करणे, नियमित स्वयंसूचनांची सत्रे करणे हे तिचे वैशिष्ट्य आहे.


Multi Language |Offline reading | PDF