बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीच्या उंच मिनारामुळे जिवाला धोका : गावकर्‍यांचा विरोध

येथील अमरगढ गावात मशिदीच्या उंच मिनाराच्या बांधकामाला गावातील लोकांनी जिवाला धोका असल्याचे सांगत विरोध चालू केला आहे. त्यामुळे गावातील हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद निर्माण झाला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अयोध्येत राममंदिर उभारा ! – केंद्रीय शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र

‘केंद्रीय शिया वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा राममंदिर निर्मितीचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाद्वारे त्यांनी अयोध्या येथे राममंदिराची निर्मिती आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे नियोजित स्थानावर मशीद बांधावी, असे म्हटले आहे.

बहिरे आणि कर्तव्य न बजावणारे पोलीस !

‘सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात केवळ २ घंटे फटाके फोडण्याची अनुमती दिलेली असतांनाही अनेक ठिकाणी नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला सायंकाळपासून ६ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते

वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून देहलीत ३ दिवस ‘ट्रक’वर बंदी !

राजधानी देहलीत दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून देहली सरकारने दिवाळीनंतर ३ दिवस (८ ते १० नोव्हेंबर) ‘ट्रक’ना देहलीत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला !

नरकचतुर्दशीच्या दिवशी फटाके वाजवण्यात आल्याने मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली होती. सुरक्षित हवेचा निर्देशांक १०० टक्क्यांच्या आत असणे आवश्यक आहे. तो सायंकाळी ५ च्या कालावधीत १७९ टक्के होता, तर रात्री साडेआठच्या कालावधीत १४५ टक्के होता.

मुंबईत मानखुर्द येथे फटाके फोडल्याविषयी पहिला गुन्हा नोंद

नियम मोडून मुंबईत फटाके फोडणार्‍या २ मुलांवर मानखुर्द येथे पहिला गुन्हा नोंद झाला आहे. शकील अहमद नावाच्या व्यक्तीने याविषयी तक्रार दिली होती. ‘फटाके उडवू नका’, असे सांगूनही या दोन मुलांनी ऐकले नाही; म्हणून तक्रार दिली’, असे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाकडून नवीन राजकीय पक्षाची स्थापना

‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नावाने मराठा समाजाच्या वतीने नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेचे नेते सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर रायरेश्‍वर येथे नव्या पक्षाची घोषणा केली.

संगमनेर येथे दत्त मंदिरात चोरी !

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र अकलापूर दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील रक्कम चोरांनी पळवली. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली; मात्र चोरीचा प्रकार मंदिर प्रशासनाच्या उशिरा लक्षात आला. हे जागृत देवस्थान असल्याने सहस्रो भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येथे येतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now