भारत संरक्षणक्षेत्रात मोठी कामगिरी करत आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्षिल सीमेवर भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांच्यासह दिवाळी साजरी केली, तसेच सैनिकांना मिठाई भरवली. त्यानंतर त्यांनी केदारनाथ मंदिराला भेट देऊन तेथे पूजा केली.

दिवाळीनिमित्त नियंत्रणरेषेवर भारत-पाक सैन्याने एकमेकांना मिठाई वाटली !

पुंछ जिल्हा मुख्यालयापासून ८ कि.मी. अंतरावर असलेल्या नियंत्रणरेषेवरील चक्का दा बाग येथील ‘राह-ए-मिलन’चे फाटक ६ नोव्हेंबरला दुपारी भारतीय सेनेच्या आग्रहास्तव उघडण्यात आले. तेथे भारत आणि पाकचे सैन्याधिकारी अन् सैनिक यांनी हस्तांदोलन केले.

घटनेच्या चौकटीत राहून राममंदिराची उभारणी होणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

राममंदिराच्या संदर्भात लवकरच निर्णय लागेल आणि घटनेच्या चौकटीत राहून राममंदिर उभारले जाईल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलला आणि हनुमानगढी येथे दर्शन घेतले.

वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात देहली येथे मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने

राजधानी देहली येथे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबर या दिवशी इंदिरा पर्यावरण भवनच्या बाहेर काही लोकांनी याच्या विरोधात निदर्शन केले.

लाच घेतांना देहलीच्या वस्तू आणि सेवा कर साहाय्यक आयुक्तांना अटक

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई करत देहलीचे वस्तू आणि सेवा कराचे (जीएस्टीचे) साहाय्यक आयुक्त जितेंद्र जून यांना दिनेश खुराना यांच्याकडून ६ लाख रुपये लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या पाद्रयाला नागालॅण्ड येथून अटक !

येथील कार्बी-आंग्लांग जिल्ह्यात १० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नागालॅण्ड येथील एका चर्चच्या ६० वर्षीय पाद्य्राला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण करून सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्‍या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदाबादचे नाव पालटून ‘कर्णावती’ करणार

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे ‘अयोध्या’ असे नामकरण केल्यानंतर आता गुजरात सरकारनेही कायद्याच्या अडचणी आल्या नाहीत, तर अहमदाबादचे ‘कर्णावती’ असे नामकरण करण्यासाठी सिद्ध असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाला सरकारला फटकारावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद !

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे कि नाही हे राज्य सरकारने ४ आठवड्यांत स्पष्ट करावे,

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत फटाके वाजवणे चालू

सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० ही फटाके वाजवण्यासाठी घालून दिलेली समयमर्यादा धुडकावत नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी फटाके वाजवण्यात आले. प्रभादेवी परिसरात पहाटेपासून चालू झालेले फटाक्यांचे सत्र दुपारी अनुमाने १२ पर्यंत कायम होते.


Multi Language |Offline reading | PDF