‘हायपरलूप’ला पायाभूत सुविधा प्रकल्पाचा दर्जा !

प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाला राज्य सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे, तसेच ‘डीपी वर्ल्ड’ आणि ‘हायपरलूप टेक्नॉलॉजीज’ यांना प्रकल्प सूचक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

फटाक्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर कार्यवाही करा ! – जिल्हाधिकारी

फटाक्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर कार्यवाही संबंधित सर्व यंत्रणांनी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी वि.ना. काळम यांनी दिल्या आहेत. या वेळी जिल्हाधिकारी काळम म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी फटाके विकत घेऊ नयेत आणि ते वापरू नयेत

नर्सिंग होमवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिश्मेंट विधेयक’ राज्य सरकारच्या विचाराधीन !

राज्यातील रुग्णालये आणि नर्सिंग होम यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने बनवण्यात येत असलेल्या प्रस्तावित कायद्याचे ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिश्मेंट (नोंदणी आणि नियमन) विधेयक’ हे सध्या राज्य सरकारच्या विचाराधीन आहे

ज्ञानेश्‍वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी राखीव भूखंडाचे आरक्षण पालटणार्‍या नगरविकास खात्याला न्यायालयाने खडसावले

खाजगी भूमीचे आरक्षण पालटून भाविकांची गैरसोय कशासाठी करता ? असा प्रश्‍न करत मुंबई उच्च न्यायालनाने नगरविकास खात्यावर ताशेरे ओढले आहेत. नगरपालिकेचा विरोध असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या अधिकारात जानेवारी २०१८ मध्ये हे आरक्षण उठवले.

देशाबाहेरील शक्तींकडून पंजाब आणि आसाममध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न ! – सैन्यप्रमुख

पंजाब आणि आसाममध्ये देशाबाहेरील शक्ती अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सैन्यप्रमुख बीपिन रावत यांनी दिली. या दोन राज्यांमध्ये फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने निराधार वृद्धांची दीपावली साजरी !

सांगली येथील शिवलीला सांस्कृतिक कला मंचने निराधार (अनाथ) वृद्धांसमवेत दीपावली साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. शिवलीलाने गेली ५ वर्षे वेलणकर अनाथालयामधील ८० मुलींसमवेत दीपावली साजरी करून त्यांना मायेचा ओलावा दिला होता.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला मये येथे श्रीकृष्ण प्रतिमाफेरी भावपूर्ण वातावरणात संपन्न

दीपावलीचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ करून घेणे आणि भगवान श्रीकृष्णाचा आदर्श समाजावर बिंबवणे या हेतूने मये ग्रामरक्षक दल आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी येथे आयोजित केलेली श्रीकृष्ण प्रतिमाफेरी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

सातारा येथे अनधिकृत पिस्तूल बाळगणारा अटकेत !

तासवडे टोलनाक्याजवळ पिस्तुलाच्या अनधिकृत विक्रीसाठी आलेल्या प्रशांत संजय थोरात यांना कराड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून १ नोव्हेंबर या दिवशी पकडले.

सांगली महापालिका क्षेत्रात विविध गोप्रेमी संघटनांच्या वतीने वसुबारस उत्साहात साजरी !

श्री शिवप्रतिष्ठान गोरक्षा समितीच्या वतीने रविवार, ४ नोव्हेंबर या दिवशी वसुबारस मिरज शहरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली.

सातारा येथे तडीपार मटकाबहाद्दर समीर कच्छी याचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धिंगाणा

तडीपारीचे आदेश मोडून मटकाबहाद्दर समीर कच्छी याने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धिंगाणा घातला. त्याने साथीदारासमवेत एका घरात घुसून तेथील ४ भ्रमणभाष बळजोरीने चोरले. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF