काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्याकडून मानहानीचा खटला प्रविष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या विरोधात देहलीतील भाजपचे नेते राजीव बब्बर यांनी पतियाळा हाऊस न्यायालयात मानहानीचा खटला प्रविष्ट केला.

मुंबई येथे बोगस कागदपत्रे बनवून जामीन मिळवून देणार्‍या धर्मांध टोळीला अटक

येथील वीस महानगर दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात पैसे देऊन जामीनदार मिळवून देणार्‍या धर्मांध टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

चारकोप (मुंबई) येथील खारफुटीक्षेत्रामध्ये वारंवार लागत असलेल्या आगीमुळे रहिवासी त्रस्त

कांदिवली (प.) येथील चारकोपच्या सेक्टर-२ मध्ये १ नोव्हेंबरला रात्री १० च्या वेळी खारफुटीमध्ये आग लागली होती. ती कचरा जाळण्यासाठी लावली ?, कि खारफुटी नष्ट करण्यासाठी लावली ?, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. ही आग अनुमाने ५० मीटर परिसरात पसरली होती.

बारामती आणि फलटण येथे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाक्यांच्या चित्रांद्वारे होणारी हिंदूंची देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखणे आणि अवैधरित्या विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयीचे निवेदन येथील तहसीलदार हनुमंत पाटील यांना देण्यात आले.

मानसिक आरोग्य कायद्याच्या कार्यवाहीसाठी प्राधिकरण गठित करण्याचा राज्यशासनाचा निर्णय

वाढत्या मानसिक रोगांच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१७ मध्ये बनवलेल्या मानसिक आरोग्य या कायद्याची प्रत्यक्ष कार्यवाही करतांना अडचणी येत असल्याने राज्यशासनाने मानसिक आरोग्य प्राधिकरण गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भिवंडीत ५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाची हत्या केल्याप्रकरणी धर्मांध कह्यात

शहरातील कुरेशीनगर परिसरात ५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी १४ वर्षीय मुलाची अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणी वाहिद अली जुबेर हुसेन अन्सारी या धर्मांधास कह्यात घेतले असून पसार असलेल्या गुलाम आणि हुसेन नर्सरी या दोन धर्मांध आरोपींचा शोध चालू आहे.

मुरबाड येथील लाचखोर तलाठी आणि कोतवाल यांना अटक

तक्रारदाराला जमिनीचा सात-बारा उतारा आणि जुने फेरफार देण्यासाठी मुरबाड येथील तलाठी किरण बाळकृष्ण चोरघे यांनी ६०० रुपयांची, तर कोतवाल दत्तात्रेय हरी मोडक यांनी १ सहस्र २०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम घेतांना चोरघे आणि मोडक यांना अटक करण्यात आली.

ठाणे येथे लाचखोर वसुली अधिकार्‍यास अटक

तक्रारदाराच्या बहिणीच्या गाळ्याची जप्तीची कारवाई थांबवण्यासाठी ठाणे जिल्हा कॉ. हौसिंग फेडरेशन येथील वसुली अधिकारी तथा करविक्री अधिकारी नितीन तुकाराम बने यांनी २ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम घेतांना बने यांना अटक करण्यात आली.

‘महाराष्ट्र वस्तू आणि सेवा करा’च्या अधिनियमात सुधारणा करण्यासह अध्यादेश काढण्याला मंत्रिमंडळ बैठकीत संमती

राज्यातील स्थानिक प्राधिकरणांना वस्तू आणि सेवाकर भरपाई अनुदान देतांना आधार वर्ष महसुलाचे सूत्र प्रतिकूल ठरत असल्यास राज्य सरकारला आधारवर्ष महसूल निश्‍चित करता येण्यासाठी त्याचा अध्यादेश काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आली.

राज्यातील अवैध बांधकामे सरसकट नियमित करण्यास उच्च न्यायालयाकडून प्रतिबंध

राज्यातील अनधिकृत बांधकामे सरसकट नियमित करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या न्या. अभय ओक आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपिठाने दिला.


Multi Language |Offline reading | PDF