‘पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन’च्या अध्यक्षपदी अधिवक्ता कडुसकर यांची निवड

‘पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशन’च्या अध्यक्षपदी अधिवक्ता सुनील कडुसकर यांची निवड करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात पाच तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित

जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये गंभीर किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.

रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन !

देशभरातील रस्ते अपघातांत दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागत असतो. हे अपघात रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे.

उत्तरपत्रिका तपासणीतील दोषींच्या वेतनावर दंडात्मक कारवाई करावी ! – उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करणार्‍या, तसेच पुनर्मूल्यांकनाच्या कामाशी निगडित असलेल्या प्राध्यापकांकडून वारंवार होणार्‍या चुकांचा त्रास विद्यार्थ्यांना होत असेल, तर अशांना मानधन न देता त्यांच्या वेतनावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत मतदानाद्वारे विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करता येईल ! – उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत निवडणुका घेऊन थेट मतदानाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करता येईल; मात्र यामध्ये राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना यांना सहभागी होता येणार नाही.

‘नेटमेड्स’ या ई-फार्मसीच्या संकेतस्थळावरून रुग्णाला न पडताळताच ऑनलाईन औषधविक्री !

ई-फार्मसीतील netmeds.com या संकेतस्थळावरून काही औषधे मागवण्यात आली होती; मात्र रुग्णाला न पडताळताच औषधाची चिठ्ठी देणार्‍या डॉक्टरांच्या संगनमताने ऑनलाईन औषधविक्री चालू होती.

नाशिक येथे पुणे विद्यापिठाच्या कामगार कायदा या विषयाची प्रश्‍नपत्रिका मिळण्यास अर्धा घंटा विलंब !

पुणे विद्यापिठाच्या ‘कामगार कायदा’ या विषयाची प्रश्‍नपत्रिका मिळण्यास अर्धा घंटा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत रहावे लागले.

नाशिक येथील भाजप आमदार सीमा हिरे यांच्या नावाचा वापर करून शासकीय विश्रामगृहाचा अवैध वापर

भाजप आमदार सीमा हिरे यांच्या नावाने शासकीय विश्रामगृहातील खोल्या आरक्षित करून चित्रपटासाठी ऑडिशन घेण्याचा प्रकार माध्यमांनी उघडकीस आणला.

पोलीस कर्मचार्‍यांसाठी ८ घंटे काम करण्याच्या कार्यपद्धतीचा कायदेशीर अध्यादेश काढावा ! – पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी

गेल्या ३० मासांपासून मुंबई शहरातील अनुमाने ९० पोलीस ठाण्यांत ८ घंटे काम करण्याची कार्यपद्धत यशस्वीरित्या चालू आहे.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मुंबई येथील कु. संस्कृती विलास गुरव (वय १५ वर्षे) !

‘कु. संस्कृती १० वीला होती, तरी तिने अभ्यासाचा ताण घेतला नाही. ती आनंदाने अभ्यास करायची आणि तिचे नामजप, उपाय आणि अथर्वशीर्ष म्हणणे यांत सातत्य होते.


Multi Language |Offline reading | PDF