सरकारने राममंदिरासाठी अध्यादेश न काढल्यास वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू !

केंद्र सरकारने राममंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा अन्यथा आवश्यकता भासल्यास राममंदिरासाठी वर्ष १९९२ सारखे आंदोलन करू, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री. भय्याजी जोशी यांनी २ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

आतंकवाद्यांकडून जम्मूतील भाजपच्या नेत्याची हत्या

आतंकवाद्यांनी जम्मूच्या किश्तवाड परिसरातील भाजपचे प्रदेश सचिव अनिल परिहार (वय ५२ वर्षे) आणि त्यांचे भाऊ अजित परिहार (वय ५५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या केली.

घुसखोरांनी सैनिकांवर दगडफेक केली, तर त्यांना थेट गोळ्या घाला ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकी सैन्याला स्पष्ट आदेश

सीमेवर रोखतांना या जमावाने जर सैनिकांवर दगडफेक केली, तर त्यांना थेट गोळ्या घाला, असा स्पष्ट आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याला दिला.

रोहिंग्या मुसलमानांची आता कारगिल सीमेवरही घुसखोरी ! – गुप्तचर यंत्रणा

म्यानमारमधून हाकलून लावलेले रोहिंग्या मुसलमान मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोरी करत आहेत. त्यांतील बहुसंख्य बंगालमध्ये स्थायिक झाले असून इतर रोहिग्यांनी भारत-पाक सीमेवरील कारगिल या संवेदनशील भागातही घुसखोरी केल्याचे आढळून आले आहे……

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला २५ लक्ष रुपयांचा धनादेश

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी २५ लक्ष रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे निष्काम कार्य सनातन संस्था करत आहे ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, पंढरपूर

सनातन संस्था हिंदु धर्माच्या प्रसाराचे अलौकिक कार्य करत आहे. सनातनचे साधक निष्काम भावाने तन, मन आणि धन यांचा त्याग करून ईश्‍वरी कार्य करत आहेत, याविषयी मला त्यांचा अभिमान वाटतो.

(म्हणे) ‘शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केलाच नाही !’

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला; मात्र अफझलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला नाही, अशी मुक्ताफळे भारतीय रक्षक आघाडीचे अधिवक्ता धारवाडकर यांनी येथे उधळली.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणार्‍या राजकीय पक्षांवर कारवाई का केली नाही ? – उच्च न्यायालयाने पोलिसांकडे मागितले स्पष्टीकरण

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटी येथे काही राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेली सार्वजनिक मंडळे रात्री १ वाजेपर्यंत पोलिसांच्या उपस्थितीत ध्वनीक्षेपक, ढोल, ताशे आणि बेंजो वाजवत होती; मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.

सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना जामीन संमत

लाचखोरीच्या आरोपावरून अटक झालेले सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना देहलीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३१ ऑक्टोबर या दिवशी जामीन संमत केला.

दीपावलीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री केल्यास गुन्हा नोंद होणार !

दीपावलीत विकण्यात येणार्‍या फराळाच्या पदार्थांची पडताळणी करण्यात येणार असून भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF