मूक सायकल फेरी काढतांना कर्नाटक पोलिसांचा मराठी भाषिक तरुणांवर अमानुष लाठीमार !

बेळगावसह इतर मराठी भाषिक भूभाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ‘काळा दिन’ पाळण्यात आला. ‘कर्नाटक राजोत्सवा’च्या पार्श्‍वभूमीवर या वेळी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

शत्रूला शत्रू म्हणण्याचे धैर्य नसलेले लोक विश्‍वाच्या संघर्षात राष्ट्र म्हणून टिकू शकत नाहीत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शत्रूला शत्रू म्हणण्याचे धैर्य नसलेले लोक विश्‍वाच्या संघर्षात राष्ट्र म्हणून टिकू शकत नाहीत. शत्रूराष्ट्र असलेला चीन आणि पाकिस्तान यांच्या वस्तूंवर पूर्ण बहिष्कार घातला पाहिजे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

‘पॉर्न’ बंदीचे स्वागतच !

सरकारने नुकतीच ८२७ ‘पॉर्न’ संकेतस्थळांवर (अश्‍लील संकेतस्थळांवर) बंदी घातली. सरकारचे या निर्णयाविषयी अभिनंदन ! याचे कारण असे की, ही संकेतस्थळे पूर्वीच्या सरकारच्या काळातही होती; पण सुसंस्कृत जनतेने मागणी करूनही त्यांवर बंदी घालण्याचा साधा विचारही तत्कालीन सरकारांनी केला नव्हता.

राजकीय पक्षांनी मंदिराच्या धार्मिक परंपरा जतन करण्यासंबंधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) – केरळ येथील शबरीमला मंदिराच्या परंपरा अहिंदूंच्या मागणीमुळे तोडण्याचा प्रयत्न साम्यवादी सरकार करत आहे; मात्र आम्ही भक्तांच्या पाठीशी आहोत. सरकारने ३ सहस्र ५०० भक्तांवर कारवाई केली आहे. ती थांबवली पाहिजे. त्यांना सोडून दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मंदिराच्या धार्मिक परंपरा जतन करण्यासंबंधीत त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, … Read more

गुरुकुल शिक्षणपद्धतीची मागणी केल्यास निश्‍चितपणे राष्ट्र आणि धर्म रक्षण होईल ! – सौ. सुनिता दीक्षित, रणरागिणी शाखा

भारतीय शिक्षणपद्धतीत गुरुकुल शिक्षणपद्धतीला पुष्कळ महत्त्व असून आपणही गुरुकुलपद्धतीची मागणी केल्यास खर्‍या अर्थाने राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण होऊन लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. सुनिता दीक्षित यांनी केले.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् अन्वेषणात सहकार्य करत नाहीत ! – अंमलबजावणी संचालनालयाची न्यायालयात माहिती

एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याच्या प्रकरणी चालू असलेल्या अन्वेषणात काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् सहकार्य करीत नाहीत. ते उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहेत.

१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली.

सुरक्षेच्या कारणास्तव सुरेंद्र गडलिंग यांना ‘सायबर लॉ’चे शिक्षण घेण्याची अनुमती पुणे न्यायालयाने नाकारली

नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येरवडा कारागृहात अटकेत असलेले अधिवक्ता सुरेंद्र गडलिंग यांनी ‘सायबर लॉ’चे शिक्षण घेण्यासाठी दिलेले आवेदन विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी नाकारले.

चौकशी आयोगासमोर मुख्यमंत्री, राज्यमंत्री, पोलीस महासंचालक साक्ष नोंदवणार नाहीत ! – राज्य सरकार

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहविभागाचे राज्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि इतर अधिकार्‍यांची साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर नोंदवली जाणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने आयोगापुढे मांडली.

मुंबईत म्हाडाच्या अभियंत्याला २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

८ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच घेतांना सूर्यकांत शंकरराव देशमुख या म्हाडाच्या अभियंत्याला म्हाडाच्या सी विभाग कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून अटक करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF