मंदिरांच्या धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी सरकारने पुढाकार न घेतल्यास तीव्र आंदोलन करू ! – प.पू. कृष्णानंद सरस्वती

आमची आई, बहीण सुखरूप रहाण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. धर्म नाही, तर काही नाही. धर्म नाही, तर जीवन संपल्यासारखे आहे. त्यामुळे हिंदूंच्या प्रथा-परंपरा सांभाळणे सरकारचे कर्तव्य आहे.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

बडगाममधील झागू अरिजल भागात २ आतंकवाद्यांना ठार केल्यानंतर शोधमोहीम हाती घेतलेले सैनिक, तसेच तेथे वृत्तांकन करणारे पत्रकार यांच्यावर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.

शिर्डीमध्ये साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या वाहनाची तोडफोड !

साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. नुकताच साई संस्थानने मुख्यमंत्रीनिधीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.

न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत १ सहस्र वर्षांनंतरही राममंदिर होणार नाही ! – शिवसेनेचे खासदार संजय राऊत

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहात राहिलो, तर १ सहस्र वर्षे उलटून गेली, तरी राममंदिर होणार नाही, असे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेशी बोलतांना केले.

पाकिस्तानच्या घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची भारताची सिद्धता आहे ! – सैन्यप्रमुख

नक्षलवाद्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे ते सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत; मात्र त्यांच्या विरोधात निमलष्करी दलाची कारवाई चांगल्या पद्धतीने चालू असून यावर शंका घेण्याचे कारण नाही.

(म्हणे) ‘आरक्षणासाठी बलीदान देईन !’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे धारिष्ट्य कोणातही नाही. कुणी तसे करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी आरक्षणासाठी बलीदानही देईन, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले.

राहुल गांधी यांच्यादेखत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात खडाजंगी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडलेल्या उमेदवारांच्या सूचीला अंतिम रूप देण्यासाठी ३१ ऑक्टोबरला रात्री झालेल्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यादेखत पक्षाचे नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात खडाजंगी झाली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे ८ साधक झाले जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

गुरुकृपायोगाचे निर्माते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितके साधनामार्ग या वचनाप्रमाणे येथील सनातनच्या आश्रमात विविध प्रकारच्या सेवा करणार्‍या ८ साधकांनी आश्‍विन कृष्ण पक्ष अष्टमी (१ नोव्हेंबर) या दिवशी ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

१९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन !

राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून चालू होणार असून ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. २ आठवड्यांच्या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस फक्त ९ दिवस असतील. त्याच कालावधीत येणार्‍या गुरुनानक जयंतीच्या दिवशीही अधिवेशन चालू रहाणार आहे.

बेळगाव येथे २ दिवसीय कार्यशाळेतून धर्मप्रेमींचा कृतीशील होण्याचा निर्धार !

२७ आणि २८ ऑक्टोबर या दिवशी २९ धर्मप्रेमींची कार्यशाळा उत्साहात पार पडली. ५ धर्मप्रेमींनी पूर्णवेळ सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF