आगरा (उत्तरप्रदेश) येथे विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चोपले !

येथील फतेहबाद रस्त्यावरील हॉटेल समोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत हिंदु धर्मावर टीका करण्यात आल्याच्या प्रकरणी विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चांगलाच चोप दिला

निर्दोष सुटका झालेल्या १६ सैनिकांना देहली उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा

वर्ष १९८७ मध्ये झालेल्या हाशीमपुरा हत्याकांडाच्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या उत्तरप्रदेश पोलीस दलातील पीएसीच्या (Provincial Armed Constabulary) १६ सैनिकांना देहली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

काश्मीरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

पूलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा सैनिक आणि आतंकवादी यांच्यात ३० ऑक्टोबरला दिवसभर चाललेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आले. हे दोघेही जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य होते.

(म्हणे) ‘मी हिंदूवादी नव्हे, तर राष्ट्रवादी नेता आहे !’ – राहुल गांधी

मी हिंदूवादी नेता नव्हे, तर राष्ट्रवादी नेता आहे. मी सर्व धर्मियांचा नेता आहे. मंदिरात जाण्यासाठी मला भाजपच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्यकता नाही. हिंदु धर्म मला त्यांच्यापेक्षा अधिक समजतो.

इंग्लंडच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून बिअरचे ‘गणेश’ असे नामकरण

इंग्लंडमधील ‘विशबोन ब्रूअरी लिमिटेड’ या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाने मॅनचेस्टरमध्ये आयोजित केलेल्या बिअरच्या एका कार्यक्रमात भारतीय नागरिकांना आकर्षित करण्यासाठी फळे आणि भाज्या यांच्यापासून बनवलेल्या बिअरला ‘गणेश’, असे नाव दिले.

बुलढाणा येथे सुतळी बॉम्बचा स्फोट होऊन लहान मुलाचा मृत्यू

पिंपळगाव सराई येथील यश गवते (वय ६ वर्षे) या मुलाचा सुतळी बॉम्बचा स्फोट होऊन मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर या दिवशी घराबाहेर असलेल्या रेतीच्या ढिगार्‍यावर तो खेळत असतांना त्याच्याजवळ असलेल्या सुतळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला

सामाजिक प्रसारमाध्यमातून देवतांचे विडंबन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कल्याण येथे एकाला अटक

येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक प्रसारमाध्यमातून देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, कल्याणचे धारकरी श्री. गणेश गोवेकर यांनी दिलेल्या …

काश्मीरमधील पसार हवाला व्यापारी नासिर शफी मीर याच्या दोघा भावांच्या घरांवर एन्आयएच्या धाडी

आतंकवाद्यांना अर्थसाहाय्य (टेरर फंडिंग) करण्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) काश्मीरमधील ११ वर्षांपासून पसार असलेला हवाला व्यापारी नासिर मीर याच्या दोघा भावांच्या घरांवर धाडी घातल्या.

आखाती देशांत महिलांना नोकरीचे आमीष दाखवून वेश्याव्यवसायाची बळजोरी करणार्‍या तिघांना अटक

आखाती देशांत उपाहारगृहामध्ये नोकरीचे आमिष दाखवून गरजू आणि गरीब महिलांना वेश्याव्यवसाय करण्याची बळजोरी केली जात होती.


Multi Language |Offline reading | PDF