विधानसभा आणि विधान परिषद येथे मराठा आरक्षण विधेयक एकमताने संमत !

मराठा आरक्षण विधेयक एकमताने संमत ! विधेयक संमत करायचेच होते, तर ते सरकारने आधीच का केले नाही ? यासाठी मराठा समाजाला आंदोलने, मोर्चे, उपोषण करण्यासाठी वेळ, श्रम आणि पैसा व्यय करावा लागला, काहींनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, तसेच अन्य कारणांमुळे मृत्यूही झाले, त्याचे काय ?

खलिस्तानी नेत्यासमवेत छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर टीकेची झोड

पाकमध्ये करतारपूर मार्गिकेच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित असलेले पंजाबमधील मंत्री तथा काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचे खलिस्तानी नेता गोपाल चावला याच्यासमवेत छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास तीव्र विरोध करू ! – ओबीसी संघटना

मराठ्यांना आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करू, अशी चेतावणी ओबीसी संघटनांनी २९ नोव्हेंबरला दिली.

श्री हनुमानाला ‘दलित’ संबोधल्याच्या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांना ब्राह्मण सभेकडून कायदेशीर नोटीस

योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंसाठी केलेले कार्य पहाता त्यांच्याविषयी समस्त हिंदूंच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यांनी अशी वक्तव्ये करून हे स्थान डळमळीत करू नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’कडून याचिका प्रविष्ट

लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’ने गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

सरकारी कार्यालयांत देवतांच्या प्रतिमा न लावण्याचा शासकीय आदेश मागे घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू !

शासकीय कार्यालयांत देवतांच्या प्रतिमा न लावण्याच्या संदर्भात अध्यादेश निघाला आहे. त्यामुळे हिंदूंमधून रोष व्यक्त केला जात होता.

धर्माला ग्लानी आली असल्याने अधिकाधिक धर्माचरण केल्यासच धर्मरक्षण होईल ! – राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी

सध्या धर्मग्लानीचा काळ चालू आहे. सत्य, प्रेम, त्याग आणि श्रद्धा ही धर्माची ४ अंगे आहेत; पण आज पहिली ३ अंगे शेषच राहिली नसून चौथे अंगही अंधश्रद्धा निर्मूलन समिती नष्ट करत आहे.

शक्तीपिठांमध्ये श्री महालक्ष्मीदेवी प्रथम स्थानी असल्याने कोल्हापुरातील नागरिक भाग्यवान ! – स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज

चार शक्तीपिठांमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रथम स्थान आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक हे खर्‍या अर्थाने भाग्यवान आहेत, असे गौरवोद्गार स्वामी गोेविंददेवगिरिजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी काढले.

सोलापूर येथे १७ गायींना पशूवधगृहाकडे नेणारा टेम्पो गोरक्षकांच्या पुढाकाराने पोलिसांनी पकडला !

सोलापूर येथील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पशूवधगृहाकडे जाणारा १७ खिलार जातीच्या गायी असलेला टेम्पो गोरक्षकांच्या पुढाकाराने पोलिसांनी पकडला.


Multi Language |Offline reading | PDF