गोव्यातील युवकांचा जागरण करून नरकासुर प्रतिमा बनवण्याकडे कल !

गोवा राज्यात अनेक युवक मंडळांचा भव्य नरकासुर प्रतिमा करण्याकडे कल दिसत आहे. ऐन परीक्षेच्या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष करून युवावर्ग रात्री जागून प्रतिमा बनवण्यात मग्न असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

पाणीटंचाईवर केलेल्या उपाययोजनेची माहिती जिल्हाधिकार्‍यांकडून माध्यमांना पाठवावी !

राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या बातम्या आल्यास त्यावर केलेल्या उपाययोजनेची माहिती जिल्हाधिकार्‍यांकडून माध्यमांना पाठवावी, असा आदेश राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेला दिला आहे.

६ डिसेंबरपूर्वी ‘दादर’ रेल्वे स्थानकाचे नामांतर न केल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही !

देश आणि राज्यातील आंबेडकरवादी जनतेची मागणी असलेल्या ‘दादर’ रेल्वे स्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’, असे नामांतर करावे. येत्या ६ डिसेंबरपूर्वी याविषयी निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मनुस्मृति वाचवा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात ‘यापुढेही आम्ही मनुस्मृतीचे दहन करणारच’, अशी दर्पोक्ती केली. भुजबळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मनुस्मृतीला असणारा विखारी विरोध तसा नवीन नाही.

शिवसेनेची प्रतिमा मलीन करणार्‍या मंदिर बचाव समितीच्या कायर्कर्त्यांवर गुन्हा नोंद करावा !  शिवसेना उपनेते

अनधिकृत बावखळेश्‍वर मंदिरावर कारवाई प्रकरणी शिवसेनेचा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा कोणताही संबंध नसतांना आंदोलन करून त्यांची प्रतिमा मलीन करणार्‍या मंदिर बचाव समितीच्या कायर्कर्त्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी आज केली आहे.

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या अटकेला १ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या अटकेला देहली उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली. तसेच या प्रकरणात सीबीआयला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने मुदतही वाढवून दिली आहे.

मतांच्या राजकारणासाठीच भाजपकडून शबरीमलाचा वाद ! – मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या

‘केवळ मतांच्या राजकारणासाठीच भाजपकडून शबरीमलाचा वाद वाढवण्यात येत आहे’, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी २८ ऑक्टोबरला येथे पत्रकारांशी बोलतांना केला.

मुंबई मुख्याध्यापक संघटनेकडून शैक्षणिक सहलीची अनिवार्यता रहित करण्याची मागणी

शैक्षणिक सहलीत दुर्घटना घडल्यास त्याला मुख्याध्यापकांनाच उत्तरदायी धरणार्‍या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काढलेल्या नियमावलींनाही संघटनेने विरोध केला आहे.

दुष्काळसदृश भागातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवास सवलत पास ! – परिवहनमंत्री दिवाकर रावते

राज्यातील दुष्काळसदृश भागातील शाळा आणि महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी राज्य परिवहन महामंडळाचा विनामूल्य प्रवास सवलत पास देण्यात येतील, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

प्रश्‍नोत्तराविषयी प्रश्‍नचिन्ह !

महापालिका प्रशासनाच्या कारभारात सर्वसाधारण सभेच्या वेळी होणारा प्रश्‍नोत्तराचा भाग हे एक महत्त्वाचे अंग आहे. प्रश्‍नोत्तराच्या तासाच्या वेळी प्रशासनाचे कामकाज, पालिकेने घेतलेले निर्णय, ठराव, त्यांची कार्यवाही आदींविषयी नगरसेवक प्रश्‍न विचारतात.


Multi Language |Offline reading | PDF