श्रीलंकेचे माजी पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक

श्रीलंकेचे माजी पेट्रोलियममंत्री तथा श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना २९ ऑक्टोबर या दिवशी अटक करण्यात आली. रणतुंगा हे २८ ऑक्टोबर या दिवशी कार्यालयात जात असतांना विरोधकांनी त्यांना अडवले.

भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी सैन्याची प्रशासकीय इमारत उडवली !

भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी सैन्याच्या प्रशासकीय इमारतीवर आक्रमण करत ती उडवली. ही घटना २३ ऑक्टोबरची असून त्याची चित्रफीत आता प्रसारित झाली आहे. यासह भारताने पाकचे ‘लाँचिंग पॅड’ही उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

गुंतवणुकीसाठी भारत हा उत्तम देश ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्योजकांना गुंतवणूक करायची असेल, तर भारत हा एक उत्तम देश आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौर्‍यावर असून त्यांनी नुकताच जपानमध्ये रहाणार्‍या भारतीय लोकांशी संवाद साधला.

चिनी दिव्यांवर बहिष्कार घालून पणत्यांच्या माध्यमातून स्वदेशीचा पुरस्कार करा !

भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात चिनी फटाके आणि दिवे यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी मातीच्या पणत्या खरेदी करून स्वदेशीचा पुरस्कार करावा.

देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक अत्याचार बोकाळल्याने त्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग नेमावा ! – लहू खामणकर, हिंदु जनजागृती समिती

देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक अत्याचार बोकाळल्याने त्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग नेमावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू खामणकर यांनी केली. येथील तहसील चौक येथे २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

साधना समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच धर्माचरण ! – सौ. सुनिता पाटील, सनातन संस्था

मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे आज हिंदू पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. त्यामुळे त्यांना हिंदु संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. ऋषिमुनींनी केलेल्या सखोल अभ्यासाचे, तसेच ग्रंथांच्या लिखाणाचे हिंदूंना महत्त्व नाही.

राज्यात २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह !

राज्यात यावर्षी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात याविषयी जनजागृती करायची ठरवली आहे

विविध क्षेत्रांतील दुष्प्रवृत्ती रोखण्यास संघटितपणे प्रयत्न करणे हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

आज शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, तसेच न्यायालयीन व्यवस्था आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून भ्रष्ट कारभार उघड करून त्याला विरोध करायला हवा. आदर्श व्यवस्थेसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच यावरील उपाय आहे.

(म्हणे) ‘फडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल !’ – राधाकृष्ण विखे-पाटील

मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस हे रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘रामराज्य’ अवतरेल, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

हिंदुद्वेषी किरण गायकवाड यांच्याकडून फेसबूकवर अश्‍लाघ्य कविता लिहून हिंदु देवता आणि श्रद्धास्थाने यांचा घोर अवमान !

‘फेसबूक’ या सामाजिक प्रसारमाध्यमावरून हिंदु धर्म, देवता आणि बोधचिन्ह यांवर कविता अन् विकृत विचारांद्वारे अश्‍लील अन् अतिशय खालच्या पातळीवर हिंदूंच्या भावना दुखावणारे द्वेषपूर्ण लिखाण स्वतःला ‘विद्रोही कवी’ म्हणवणारे किरण विजय गायकवाड (रहाणार शिर्डी, जिल्हा नगर) यांनी केलेे आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now