अबकी बार, राममंदिर फिर एक बार !

‘दिवाळीच्या आधी राममंदिराचे उभारणी चालू होईल’, अशी आशा अनेकांना होती. ती सुनावणी जानेवारी २०१९ मध्ये ढकलल्यामुळे आता पुन्हा एकदा राममंदिराच्या उभारणीच्या संदर्भात वादविवाद झडू लागले आहेत. आतापर्यंत अनेक निवडणुका भाजपने राममंदिराच्या सूत्रावरच लढवल्या आहेत.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस अधिकार्‍याची हत्या

पुलवामा जिल्ह्यात वाहिबाग येथे आतंकवाद्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाजे अधिकारी इम्तियाज अहमद मीर (वय ३० वर्षे) यांची गोळ्या घालून हत्या केली.

गोरेगाव (मुंबई) येथील १०० कुण्डीय श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञाचा सहस्रावधी भाविकांनी घेतला लाभ !

स्वामी करपात्री फाऊंडेशनद्वारे गोरेगाव येथे २४ ऑक्टोबर या दिवशीपासून आयोजित करण्यात आलेल्या १०० कुण्डीय श्री गणेश महालक्ष्मी महायज्ञाचा लाभ सहस्रावधी भाविकांनी घेतला.

गोवर-रुबेला या लसीच्या लसीकरणावरून पालक-शिक्षक यांत वाद !

लसीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक पालकांचे प्रबोधन करण्यासाठी वर्ग घेत आहेत; मात्र जागरूक पालकांकडून अनेक शंका उपस्थित होत आहेत. त्याचे निरसन करणे वैद्यकीय ज्ञानाअभावी शिक्षकांना शक्य होत नाही.

धर्मशास्त्राची ऐशीतैशी !

नुकतीच सर्वत्र कोजागरी पौर्णिमा साजरी झाली. या पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. हिंदु धर्मशास्त्रानुसार रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे.

बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास नकार देणार्‍या पोलिसाचे निलंबन

बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यास नकार देणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. जाधव हे नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.

रांजनपाडा (खारघर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनाचे आयोजन

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुळात जन्म देणार्‍या कुलदेवीची प्रार्थना आणि नामस्मरण करावे. मनात चुकीचे विचार येत असतांना त्यांविषयी देवाला सतत क्षमा मागावी आणि पुढे ती चूक करू नये.

‘चिनी बनावटीच्या पणत्या, आकाशकंदील, विद्युत् दिवे अन् अन्य वस्तू यांवर बहिष्कार घाला !’ हे पत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना ! आपण एखादी चिनी बनावटीची वस्तू खरेदी करतो, तेव्हा आपल्याच देशातील पैसा आपण चीनला देत असतो. यामुळे शत्रुराष्ट्र चीनचे हित साधले जाऊन राष्ट्रद्रोहाचे पाप आपल्याला लागते. या संदर्भात प्रबोधन करणारे पत्रक सिद्ध करण्यात आले आहे.

उल्हासनगर येथे धर्मांध रिक्शाचालकाकडून हिंदु रिक्शाचालकास अमानुष मारहाण !

येथील शांतीनगर परिसरात धर्मांध रिक्शाचालक सलमान शामद खानने आपल्या मित्रांसमवेत रिक्शाचालक संतोष वानखेडे यांना अमानुष मारहाण करत घायाळ केल्याची घटना २८ ऑक्टोबरला सकाळी घडली आहे.

मुंबई येथे भूमिगत गटारांची स्वच्छता करणार्‍या २१२ कंत्राटी स्वच्छता कामगारांचा ३ वर्षांत विविध आजारांनी मृत्यू

कंत्राटदारांनी मागील २ वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी आणि कामगार विमा योजनेत पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी २३ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण चालू केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF