रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली !

समस्त हिंदूंचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षीच्या जानेवारी मासापर्यंत पुढे ढकलली.

हिंसाचाराच्या घटनांतील खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय !

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी झालेली हिंसक निदर्शने, तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बहुतांश ठिकाणी झालेला हिंसाचार यांप्रकरणी खटले नोंदवले गेले आहेत.

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनुस्मृति जाळण्याचा प्रयत्न !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी आणि मनुस्मृति यांच्या विरोधात घोषणा देत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना रोखले, असे समजते.

पंजाबच्या सीमेवर २ पाकिस्तानी घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाकडून अटक

सीमेवर गस्तीसाठी असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना दोघे पाकिस्तानी घुसखोर भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत असल्याचे आढळून आले.

मुसलमान काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करू शकतात, तर हिंदू भाजपला का करू शकत नाही ? – भाजपचे राजस्थानमधील नेते धनसिंह रावत

सर्व मुसलमान जर काँग्रेसला मतदान करू शकतात, तर हिंदू संघटित होऊन भाजपला का मते देऊ शकत नाहीत ?, असा प्रश्‍न राजस्थानमधील सत्ताधारी भाजपचे नेते तथा राज्यमंत्री धनसिंह रावत यांनी उपस्थित केला.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना येथील न्यायालयाने ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

धुळे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा स्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाची सांगता !

‘लाना होगा, लाना होगा, हिंदु राष्ट्र लाना होगा’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या घोषणांच्या निनादात हिंदु जनजागृती समिती आयोजित  प्रांतीय हिंदू अधिवेशनाची सांगता झाली.

अकोला येथे दीड दिवसीय विदर्भस्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा समारोप !

२७ आणि २८ ऑक्टोबर या दिवसांत अकोला येथे जानोरकर मंगल कार्यालयात विदर्भस्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या वेळी सनातनचे विदर्भ प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट,..

नक्षलसमर्थकांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यास पुणे पोलिसांना मुदतवाढ

कोरेगाव-भीमा प्रकरणी नक्षलसमर्थकांच्या विरोधशत आरोपपत्र प्रविष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना मुदतवाढ दिली.

रामजन्मभूमी प्रकरणी सर्व खासदारांच्या कार्यालयात संकल्प सभा होणार !

भाजपच्या सत्तेला केवळ ६ मास आहेत आणि ६ मासांतही चमत्कार होतात. सरसंघचालकांनी रामजन्मभूमीसाठी कायदा करण्याचे सरकारला सांगितले आहे. त्यांचा शब्द हा ब्रह्मवाक्यासारखा असतो. या संदर्भात सर्व खासदारांच्या कार्यालयात संकल्प सभा होणार आहे, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे प्रांत मंत्री अजय निलदावार यांनी २७ ऑक्टोबरला येथे दिली.


Multi Language |Offline reading | PDF