महिलांना अंधारात ठेवून प्रसुती शस्त्रकर्म करण्याचा निर्णय ! – शिवसेना नगरसेविका

गेल्या काही वर्षांपासून खासगी प्रसुतीगृहांमध्ये नैसर्गिक प्रसुतीपेक्षा शस्त्रकर्मांद्वारे होणार्‍या प्रसुतींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातही गोष्ट आढळून आली आहे. बर्‍याचदा आर्थिक लाभ होत असल्यामुळे महिलांना अंधारात ठेवून शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला जातो.

ठाणे येथील माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांना अटक

ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडे खंडणीसाठी बर्गे यांनी तगादा लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मुंबईत धूलिकणांनी उच्चांक गाठल्याने हवेच्या गुणवत्तेत घसरण

पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरच्या आरंभीपासून मुंबईत धूलिकणांनी उच्चांक गाठला आहे. हवेची गुणवत्ता अशीच राहिली, तर मुंबईची अवस्था देहलीसारखी प्रदूषणमय होण्याची भीती आहे.

दारव्हा (यवतमाळ) येथे जुगार खेळणारे ५ पोलीस निलंबित

येथील पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांनी जुगार खेळणार्‍या ५ पोलिसांचे निलंबन केले आहे. पोलीस जुगार खेळत असल्याचे ध्वनीचित्रीकरण उपलब्ध झाले होते. पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातच कर्तव्यावर असतांना हे पोलीस जुगार खेळत असल्याची चर्चा होती.

मुंबई महापालिका दुकानदारांकडे प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्यास परवाना रहित करणार !

खरेदीच्या निमित्ताने दिवाळीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे दुकानदारांकडे त्या आढळून आल्यास त्यांचा परवाना रहित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाला असून त्याची न्यायालयीन चौकशी करावी ! – सचिन सावंत, काँग्रेस

राज्यात जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाला असून हा घोटाळा दडवण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी केली.

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला ४०० हून अधिक नागरिकांचा स्वाक्षरीद्वारे पाठिंबा !

चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करावी, मुसलमानांसाठी बक्षीसपात्र मालमत्तेसाठी नोंदणी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, प्रयाग कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्‍या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा केलेला निर्णय त्वरित रहित करावा

नाशिक येथे पोलीस अधिकार्‍याला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या आरोपीची पोलिसांकडून शहरात धिंड

येथील पोलीस अधिकार्‍याला मारण्याची धमकी देणार्‍या आरोपी जया दिवे याची पोलिसांकडून शहरात धिंड काढण्यात आली. तो सराईत गुन्हेगार असून नुकताच एका प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता. त्यामुळे त्याच्या समर्थकांनी एका इमारतीच्या गच्चीवर फटाके वाजवले

आर्टीईच्या ५० सहस्रांहून अधिक जागा रिक्त

चालू शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने राज्यभरात राबवलेल्या आर्टीई प्रवेशप्रक्रियेनंतर अद्यापही ५० सहस्रांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

गेल्या काही दिवसांपासून चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार सतत घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष आयोग नेमावा


Multi Language |Offline reading | PDF