आयएस्आयचा अटकेतील हेर करत होता ५ वर्षांपासून हेरगिरी !

भारतीय सैनिकांच्या छावण्यांची माहिती, महत्त्वाचे नकाशे आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवणार्‍या एका आयएस्आय हेराच्या आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी बुलंदशहर येथून मुसक्या आवळल्या.

डाव्यांचे सरकार नास्तिक असल्याने ते शबरीमला मंदिर उद्ध्वस्त करील ! – भाजप

डाव्यांचे सरकार नास्तिक असून ते शबरीमला मंदिर उद्ध्वस्त करतील, अशी टीका भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी केरळ सरकारवर केली.

सिंचन घोटाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सहभागाविषयी सरकारची भूमिका लवकरच न्यायालयाला कळवू ! – मुख्यमंत्री

सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा सहभाग आहे कि नाही, याविषयीची सरकारची भूमिका लवकरच न्यायालयात कळवणार आहोत.

(म्हणे) ‘फाळणीसाठी भारतीय नागरिकही उत्तरदायी !’ – माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी

भारताच्या फाळणीला जेवढे पाकिस्तानी उत्तरदायी आहेत, तेवढेच भारतीय नागरिकही उत्तरदायी आहेत; मात्र आपल्याकडे ‘ब्रिटीश आणि पाकिस्तानातील मुसलमान फाळणीसाठी उत्तरदायी आहेत’, असा समज आहे.

नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात ४ सैनिक हुतात्मा

नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४ सैनिक हुतात्मा झाले.

पाकिस्तान उद्ध्वस्त होऊन जगाच्या नकाशातून पुसून जाईल !

आप्पाचीवाडी कुर्ली येथील हालसिद्धनाथ यात्रेत पू. भगवान डोणे महाराज (वाघापूरे) यांची भाकणूक (भविष्यवाणी)

अमेरिकेत ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात गोळीबार : ११ जण ठार

स्क्विरल हिल परिसरामधील ‘ट्री ऑफ द हिल’ या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर रॉबर्ट बॉवर्स (वय ४६ वर्षे) याने केलेल्या बेछूट गोळीबारात ११ जण ठार, तर ६ जण घायाळ झाले.

शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे वसतीगृह आणि रुग्णांसाठीच्या वार्ड इमारतीमध्ये पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था नाही ! – मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षलकुमार महाजन

शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या ५ मजली वसतीगृहात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. पाणी शुद्धीकरणाची सुविधा बंद असल्याने डॉक्टरांना बाहेरून पिण्याचे पाणी आणावे लागते. गेल्या २ वर्षांपासून पाठपुरावा करूनही रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.

ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक १५४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात रेल्वेरूळ ओलांडतांना सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले आहेत. मुंबई रेल्वेमध्ये ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक १५४ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF