नक्षलसमर्थक अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांना पोलीस कोठडी

कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन आवेदन फेटाळल्यानंतर २६ ऑक्टोबर या दिवशी पुणे पोलिसांनी अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज या तिघांना अटक केली. २७ ऑक्टोबर या दिवशी या तिघांना न्यायालयात उपस्थित केले असता…..

दगडफेक करणार्‍या नागरिकांमुळे सैनिक हुतात्मा होत असतांनाही अशा नागरिकांना ‘आतंकवादी’ ठरवू दिले जात नाही ! – सैन्यप्रमुख

दगडफेक करणार्‍या नागरिकांमुळे सैनिक हुतात्मा होतात. तरीही त्यांना ‘आतंकवादी’ ठरवू दिले जात नाही, असे विधान सैन्यप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.

(म्हणे) ‘आम्ही केरळमधील भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत !’

सध्या केरळमध्ये धार्मिक परंपरा आणि राज्य सरकारची क्रूरता यांच्यात संघर्ष चालू आहे. भाजप, संघ आणि इतर संघटना यांच्या २ सहस्रांहून अधिक कार्यकर्त्यांना कह्यात घेण्यात आले आहे. आम्ही डाव्यांना सांगू इच्छितो की,….

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ‘व्हिआयपी’ वागणूक दिल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ४ पोलीस शिपाई निलंबित !

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपी इकबाल कासकरला ‘व्हिआयपी’ (अतीमहनीय व्यक्तींप्रमाणे) वागणूक दिल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ४ पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

‘आयएस्आय’साठी हेरगिरी करणार्‍या धर्मांधास बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथून अटक

‘आयएस्आय’ या पाकच्या गुप्तहेर संघटनेसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने जाहीद नावाच्या धर्मांधाला बुलंदशहर येथून २६ ऑक्टोबरला रात्री अटक केली.

आज श्रीक्षेत्र कुर्ली अप्पाचीवाडी येथे भाकणुकीचा सोहळा !

अप्पाचीवाडी (जिल्हा बेळगाव) – येथील हालसिद्धनाथ यात्रेस गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. खडक मंदिरात रायबागचे प्रमुख मानकरी बागेवाले यांच्या हस्ते कर बांधून यात्रेस प्रारंभ झाला. दुपारी १ वाजता नाथांची पालखी खडक मंदिरात उत्सवासाठी….

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संकल्पनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही विचार व्हावा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विविध वेळी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अनेक ठिकाणी आचारसंहिता लागू असते. त्याचा स्थानिक विकासकामांच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी लिखाण पाठवतांना व्याकरणदृष्ट्या पडताळून पाठवा !

‘सध्या सनातन प्रभात नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यासाठी अनेक साधकांकडून विविध विषयांवरील लिखाणाच्या शेकडो धारिका आणि हस्तलिखित मजकूर रामनाथी आश्रमातील संकलन विभागात येत आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात विजयादशमीला दीपस्वरूपी विश्‍वामित्र ऋषि आणि वसिष्ठ ऋषि यांचे पूजन !

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात साधकांना मार्गदर्शन व्हावे, साधकांच्या साधनेत आणि धर्मकार्यात येणारे अडथळे दूर व्हावेत, हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होऊन पृथ्वीवरील सज्जन हिंदूंचे रक्षण व्हावे,


Multi Language |Offline reading | PDF