पुणे येथील अष्टमीची पूजा कथित प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी उधळली !

नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एरंडवणे भागातील एखंडे कुटुंबियांकडून पूजा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी बोकडाचा बळी दिला जाणार होता. त्याला आक्षेप घेत प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी एखंडे कुटुंबियांच्या घरात घुसून ही पूजा उधळली.

बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे श्री दुर्गादेवीचे विडंबन रोखले !

‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अ‍ॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक जोडलेले असतात. हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ उघडल्यावर त्यावर श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र असल्याचे सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर यांना लक्षात आले.

बेस्टच्या वीज देयक थकबाकीदार अभय योजनेतून ४ कोटींची वसुली

ग्राहकांना थकित वीज देयकाची रक्कम भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी थकबाकीवरील व्याज आणि विलंबित आकार शुल्क माफ करण्याची अभय योजना सहा महिन्यांसाठी राबवली होती.

मुंबईत दसर्‍यानिमित्त अनुमाने २ सहस्र नवीन वाहनांची नोंदणी

दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात अनुमाने २ सहस्र नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर्टीओ) सर्वाधिक ६११, ताडदेव आर्टीओत ५८५, बोरीवली आर्टीओत ३३२, तर वडाळा आर्टीओत ४७४ वाहनांची नोंदणी झाली आहे.

प्रवाशांच्या स्वच्छताविषयीच्या तक्रारींचा आढावा घेऊन कंत्राटदारांची देयके देण्याची मध्य रेल्वेची संकल्पना

मध्य रेल्वेकडून स्वच्छतेचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारांना त्यांच्या दायित्वाची जाणीव होण्यासाठी प्रवाशांच्या तक्रारींचा आढावा घेऊन कंत्राटदारांची देयके (बिल) गुणांकनानुसार दिली जात आहेत.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेल्याने टॅक्सी उलटली !

टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टॅक्सी उलटी झाल्याची घटना ताडदेव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी टॅक्सीचालकाला अटक केली आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्नीशमन विभागात ९२७ पदे रिक्त !

मुंबई महापालिकेत अग्नीशमन विभागात ३ सहस्र ८०७ अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे मंजूर आहेत; परंतु त्यातील २ सहस्र ८८० पदे भरली असून ९२७ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक (आबा) साळुंखे पाटील यांची शिवीगाळ आणि महिलांविषयी अपशब्द उच्चारलेली ध्वनीफित सामाजिक संकेतस्थळावर प्रसारीत

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक (आबा) साळुंखे पाटील यांनी शिवीगाळ केल्याची एक ध्वनीफीतीत सामाजिक संकेतस्थळावर फिरत आहे.

गोकर्ण (कर्नाटक) येथील श्री महाबलेश्‍वर मंदिरात भाविकांना जीन्स पॅन्ट घालून प्रवेश करण्यास बंदी

कर्नाटकमधील गोकर्ण येथील श्री महाबलेश्‍वर मंदिरात भाविकांना जीन्स पॅन्ट आणि ‘बरमूडा’ (छोटी पॅन्ट) घालून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरुषांना धोतर, तर महिलांना साडी अथवा सलवार-कुर्ता परिधान करूनच या मंदिरात प्रवेश करता येणार आहे.

सरकारने संसदेत कायदा पारित करून मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करावा ! – सरसंघचालक डॉ. भागवत

अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी देशातील कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. मंदिर उभारणीच्या सर्व सकारात्मक प्रयत्नात संघाची भूमिका सहकार्याची आहे.


Multi Language |Offline reading | PDF