गोंडा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री दुर्गामूर्तीच्या मिरवणुकीवर दगडफेक

येथील कटारा बाजार येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह अनेक भाविक घायाळ झाले.

शबरीमला येथे हिंदु भाविकांच्या संघटितपणापुढे सरकार आणि पोलीस नमले : आणखी २ महिलांना परत पाठवले !

शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटांतील महिलांना प्रवेश न देण्याच्या सूत्रावरून हिंदु भाविकांचे सलग ५ व्या दिवशीही आंदोलन चालूच होते. भाविकांच्या संघटित विरोधामुळे आणखी २ महिलांना दर्शनाविनाच परत जावे लागले.

१४ सहस्र लाडूंची अवैधपणे विक्री !

नवरात्रीनिमित्त तिरुपती बालाजीच्या मंदिरात प्रसाद म्हणून ठेवण्यात आलेल्या १४ सहस्र लाडवांच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने भाविकांसाठी लाडवांचा प्रसाद ठेवण्यात आला होता आणि त्यासाठी १०० रुपये…..

(म्हणे) ‘शबरीमला आंदोलन म्हणजे राममंदिराचा निर्णय धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलाच, तर रस्त्यावर उतरण्याची रंगीत तालीम !’ – निखिल वागळे

शबरीमलाविषयी न्यायालयाचा आदेश धुडकावण्यात येत आहे. ही उद्याच्या राममंदिराच्या निर्णयाची सिद्धता आहे. हे आंदोलन म्हणजे राममंदिराचा निर्णय धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलाच, तर रस्त्यावर उतरण्याची रंगीत तालीम आहे

पंढरपूर येथे झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर ‘क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराने सन्मानित !

झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त ‘क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार देण्यात आला.

बलात्काराच्या प्रकरणी केरळमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी केरळ पोलिसांकडून राज्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. वर्ष २०१३ मध्ये चंडी यांनी बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका पीडित महिलेने केला होता.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

कुलगाम जिल्ह्यातील लारनू येथे २१ ऑक्टोबरला पहाटे सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले. ही चकमक तब्बल ५ घंटे चालली. या चकमकीत २ सैनिक गंभीररित्या घायाळ झाले.

‘सिमला’ शहराचे ‘श्यामला’ असे नामकरण करणार !

भाजपशासित हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या ‘सिमला’ या शहराचे नामकरण करून ते ‘श्यामला’ असे करण्यात येणार आहे. येथे श्यामलादेवीचे मंदिर आहे. त्यावरून ब्रिटिशांनी ‘सिमला’ असे संबोधण्यास आरंभ केला, असे सांगितले जाते.

बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा हिंदुत्वच हाती घेणार ! – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे बाळकडू मला मिळाले आहे. मी हिंदु आहे आणि हिंदु म्हणूनच मरणार. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा हिंदुत्वच हाती घेणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालणार

बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीएच्या) अंतर्गत खटला भरण्यासाठी वैधरित्या पूर्वसंमती घेण्यात आलेली नाही, असा कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केलेला अर्ज ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.


Multi Language |Offline reading | PDF