शबरीमला मंदिराच्या बाहेर सहस्रो भाविकांचे सलग चौथ्या दिवशीही आंदोलन चालूच !

शबरीमला मंदिरात एका ३८ वर्षीय महिलेने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एस्.पी. मंजू असे तिचे नाव असून ती एका मागासवर्गीय संघटनेची पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.

अमृतसर रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करणार ! – पंजाब सरकार

येथील जोडा रेल्वेफाटक अपघाताच्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिली. या प्रकरणी पुढील ४ आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा आज ‘क्रांतीवीर वसंतबाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कारा’ने सन्मान !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ असलेले, हिंदुहितासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना भक्कम कायदेशीर साहाय्य करणारे झुंजार अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर…..

दक्षिण काश्मीरमधील आतंकवाद प्रभावित ४ जिल्ह्यांतील निवडणुकीत भाजपची सरशी !

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, कुलगाम, पुलवामा आणि शोपियां या आतंकवाद प्रभावित जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने १३२ वॉर्डांपैकी ५३ वॉर्डांमध्ये विजय मिळवला आहे.

शिर्डी संस्थान विश्‍वस्त आणि कर्मचारी यांना एकूण १ कोटी रुपयांची चांदीची नाणी देणार !

‘साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवा’ची आठवण म्हणून संस्थानातील कर्मचारी, सर्व आजी विश्‍वस्त आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकारी यांना साई प्रतिमा असलेली चांदीची नाणी विनामूल्य दिली जाणार आहेत; मात्र भाविकांना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या आवारातील साधिकेचे अवैधरित्या चित्रीकरण करणार्‍या ‘इंडिया टुडे’च्या पत्रकारांच्या विरोधात फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातन संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन आश्रमाच्या आवारात उभ्या असलेल्या सनातनच्या साधिकेचे अवैधरित्या चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे पत्रकार मयुरेश गणपत्ये आणि छायाचित्रकार महेश मोरे …..

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवचंडी याग संपन्न !

‘श्रीविष्णुचरणस्थित श्री लक्ष्मीदेवी ही नवरात्रीच्या कालावधीत प्रामुख्याने असुरांचे निर्दालन करणारी श्री महाकाली, कार्याला गती देणारी समृद्धवर्धिनी श्री महालक्ष्मी आणि स्थैर्य प्रदान करणारी श्री महासरस्वती या रूपांत प्रकट होते. पृथ्वीवर नवरात्रीत देवीचे तत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते.

दिनदर्शिकेद्वारे परिचितांना आपल्या व्यवसायाची माहिती देतांना धर्मकार्यही घडावे, यासाठी स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घ्या !

‘अनेक उद्योजक स्वतःच्या आस्थापनाची (कंपनीची) प्रसिद्धी करण्यासाठी त्यांची विज्ञापने असणारी दिनदर्शिका (कॅलेंडर) प्रकाशित करून ती ग्राहक, कर्मचारी, नातेवाईक आदींना भेट स्वरूपात देतात.

भारतात मरण स्वस्त झाले आहे !

अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या अपघातामुळे सारा देश हळहळला आहे. रावणदहनाच्या वेळी रावणाच्या प्रतिकृतीतील फटाके फुटू लागले, तेव्हा जमाव मागे मागे सरकत रेल्वे रूळावर आला


Multi Language |Offline reading | PDF