केंद्र सरकारकडून ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रियांवर बंदी

‘भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदे’ने (‘सीसीआयएम्’ने) केलेल्या शिफारसींवरून मोदी सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने देशभरातील ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील चालू वर्षीची प्रवेशप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला.

अपुर्‍या पावसामुळे राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्राचा काही भाग, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे तेथील शेती संकटात आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा चालू झाला आहे.

यंदा मराठवाड्यात वर्ष १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती !

या वर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस न पडल्याने मराठवाड्यात वर्ष १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती या वर्षी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जिल्ह्याजिल्ह्यांमधील दुष्काळाचा आढावा घेत आहेत.

शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठकांना आरंभ

दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय बैठका घेण्यास आरंभ केला आहे. आतापर्यंत बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत बैठका घेण्यात आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची पर्यावरण अहवाल सादर करण्यातही २ मास दिरंगाई !

येथील महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा एक नमुना समोर आला आहे. महापालिकेचा ३१ जुलैला सादर व्हायचा पर्यावरण अहवाल २ मास उशिराने सिद्ध झाला आहे. या संदर्भात सबंधित कंत्राटदाराला उशिरा कार्यादेश देण्यात आल्याने अहवालाला उशीर झाल्याची माहिती मिळत आहे.

पलवल (हरियाणा) येथील मशिदीच्या बांधकामाला लष्कर-ए-तोयबाकडून अर्थपुरवठा

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील उत्तवार येथील खुलाफा-ए-रशीदीन या मशिदीच्या बांधकामासाठी ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेने अर्थपुरवठा केल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) अन्वेषणातून समोर आले आहे.

शहरातील आरक्षित भूखंड हस्तांतरणाच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्याकरिता मुंबई महापालिका नवीन मसुदा बनवणार !

शहरातील आरक्षित भूखंड हस्तांतरणाच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्याकरिता मुंबई महापालिका ‘महाराष्ट्र प्रादेशिक रचना कायद्या’त (एम्आर्टीपी) सुधारणेसाठी नवीन मसुदा बनवणार आहे.

मुलींचे बालविवाह आणि कुमारी माता या समस्या थांबवण्यासाठी शासनाची मोहीम !

बालविवाहासह कुमारी मातांची समस्या राज्यात गंभीर होत चालली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य बाल हक्क आयोगाने विशेष मोहीम राबण्याच्या निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये भाविक, राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा विरोध चालूच

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध अद्यापही तितक्याच शक्तीने चालू आहे. भाजपने गेल्या ५ दिवसांपासून पंडालम ते थिरुवनंतपूरम् असा मोर्चा काढला.

अमली पदार्थ विक्री करणार्‍या २ धर्मांधासह एका नायजेरियनला अटक

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या २ धर्मांधासह एका नायजेरियनला पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथून मानझार दी मोहद शेख याला अटक केली.


Multi Language |Offline reading | PDF