सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला उत्तर देण्यास सैन्य सदैव सिद्ध ! – लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह

सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला उत्तर देण्यास सैन्य सदैव सिद्ध आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी केले. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी भारताला डिवचतांना एका ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या बदलल्यात १० ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करण्याची चेतावणी दिली ….

पाक चीनकडून क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत !

पाक चीनकडून सिद्ध करण्यात आलेले ‘एच्डी-१’ हे ‘सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सिद्धतेत आहे. चीनचे हे नवे क्षेपणास्त्र भारताच्या ‘ब्राह्मोस’ या क्षेपणास्त्रापेक्षा अधिक क्षमतेचे असल्याचा दावा केला जात आहे.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे गरबा खेळण्यासाठी आलेल्या धर्मांध महिलेचे देवीच्या मूर्तीवर आक्रमण !

येथील पश्‍चिम भागातील यशवंत गौरव श्री प्रस्थ या ठिकाणी एका नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी आलेल्या धर्मांध महिलेने श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर आक्रमण केले.

खडकी (जिल्हा पुणे) येथील ४ सैनिकांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद

खडकी येथील लष्करी रुग्णालयात काम करणार्‍या ४ सैनिकांनी मूकबधीर महिलेवर ४ वर्षे बलात्कार केल्याच्या प्रकरणी चौघांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तमिळनाडूतील मंदिरातून १०० वर्षे प्राचीन मूर्तींची चोरी

येथून जवळच असलेल्या कुरुविठूराई येथील चित्रराधा वल्लभ पेरूमल मंदिरातील १०० वर्षे प्राचीन श्री वल्लभ पेरूमल, श्री श्रीदेवी, श्री भूमादेवी आणि श्री श्रीनिवासागर या देवतांच्या पंचधातूच्या ४ मूर्ती १३ ऑक्टोबर या दिवशी रात्री …..

बाबा रामपाल यांना आणखी एका प्रकरणात जन्मठेप

हरियाणामधील न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मधील हत्येच्या आणखी एका प्रकरणात बाबा रामपाल यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने त्यांना ११ ऑक्टोबर २०१८ ला दोषी ठरवले होते.

पाकमध्ये मुलीवर बलात्कार करणार्या वासनांधास तिच्या वडिलांसमोर दिली फाशी

पाकमधील लाहोर येथील ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी इमरान अलीला (२४) फाशी देण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ५.३० वाजता इमरान याला लाहोरमधील कोट लखपत कारागृहामध्ये फासावर लटकवण्यात आले.

कर्जबुडव्या मेहूल चोकसीची २१८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पंजाब नॅशनल बँकेचे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारे घोटाळेबाज मेहूल चोकसी यांची २१८ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली. यापूर्वी नीरव मोदीसह त्यांचा भाऊ, तसेच त्यांचे अन्य ४ साथीदार यांची ६३७ ….


Multi Language |Offline reading | PDF