गडचिरोली येथे झालेल्या चकमकीत १ नक्षलवादी ठार !

येथील कुरखेडा येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे. घटनास्थळी बराच वेळ चकमक चालू होती. जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती.

मराठा समाजाचा आरक्षणासाठी १५ नोव्हेंबरनंतर विशेष अधिवेशन ! – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी १६ नोव्हेंबरनंतर विशेष अधिवेशन बोलावून कायदा केला जाईल, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एका कार्यक्रमासाठी नुकतेच नाशिकमध्ये आले असतांना ते बोलत होते.

शुल्लक कारणावरून धर्मांधाने शिवीगाळ करत रोकड लांबवली !

रिक्शाला सायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून धर्मेंत चौहान यांना अस्लम सय्यद उपाख्य बाबा (वय ३५ वर्षे) आणि इब्राहिम शेख (वय ३४ वर्षे) या धर्मांधांनी शिवीगाळ करत त्यांकडील तीन सहस्रांची रोकड हिसकावून घेतली.

चालू वर्षात आयटी क्षेत्रातील आस्थापनांत लैंगिक छळाच्या घटनांची सर्वांधिक नोंद

चालू वर्षात आयटी क्षेत्रातील आस्थापनांत लैंगिक छळाच्या घटनांची सर्वाधिक नोंद झाली असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

अनेक वर्षांपासून चालू असलेली रावणदहनाची परंपरा बंद होणार नाही ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

नागपूर येथील जनार्दन मूल नावाच्या एका गृहस्थाने रावणाचे दहन करण्याला विरोध करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती. न्यायालयाने ही याचिका अत्यंत चुकीची आणि फुटकळ आहे. तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका प्रविष्ट केली आहे, असे ताशेेरे ओढले होते.

राज्यातील ११ प्रादेशिक परिवहन कार्यालयांत वाहनपडताळणी जागेअभावी स्थगित !

२५० मीटरच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने ११ ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांत वाहन पडताळणी स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने १६ ऑक्टोबर या दिवशी उच्च न्यायालयाला दिली.

धारावी पुनर्विकास प्रकल्प ७ वर्षांत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा ठराव

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देण्याचा निर्णय १६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. येत्या ७ वर्षांत धारावीचा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

(म्हणे) ‘पोलिसांनी शस्त्रपूजनाची शस्त्रे जप्त करावीत !’ – प्रकाश आंबेडकर यांचे दबावतंत्र

विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अवैध शस्त्रपूजन केले जात आहे. या शस्त्रपूजनाला विरोध करून ती पोलिसांनी शासनाधीन (जप्त) करावी; अन्यथा पोलिसांविरोधात न्यायालयात जाऊ, असा दबाव भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टाकला आहे.

चुकीचा अंदाज वर्तवणारे हवामान खाते बंद करा ! – मराठवाड्यातील शेतकर्‍यांची मागणी 

हवामान खात्याने यंदा सरासरी इतका म्हणजेच चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यावर राहून आम्ही पेरण्या केल्या; पण प्रत्यक्षात पुरेसा पाऊस पडलाच नाही.

लोकशाहीचे विडंबन !

आज पुन्हा एकदा धर्मपरंपरांचे उल्लंघन झाले…, पुन्हा एकदा हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवल्या गेल्या…, पुन्हा एकदा या देशातील १०० कोटी जनतेला कस्पटासमान लेखून मूठभर निधर्म्यांचे तळवे चाटण्याचे लांच्छन या देशावर लागले !


Multi Language |Offline reading | PDF