आज विजयादशमी

हिंदूंनो, सर्वार्थाने आदर्श अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामाचा आदर्श घेऊन आणि धर्माचरण अन् साधना करून ‘रामराज्या’च्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ शबरीमला मंदिराच्या बाहेर निदर्शने करणार्‍या भाविकांवर पोलिसांकडून लाठीमार !

शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटांतील महिलांना प्रवेश न देण्याच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी, तसेच न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी असंख्य भाविकांनी मंदिराच्या बाहेर निदर्शने केली, तसेच मोर्चे काढले.

परभणी येथे पोलिसांकडून श्री दुर्गामाता दौड बंद पाडण्याचा प्रयत्न !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला…..

पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मेरठमधून एका सैनिकाला अटक !

पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मेरठ कंटोनमेंटमधून एका सैनिकाला अटक करण्यात आली. सैन्याच्या ‘सिग्नल रेजिमेंट’मध्ये कार्यरत असलेल्या या सैनिकाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.

लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याच्या प्रकरणात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम्.जे. अकबर यांचे त्यागपत्र

लैंगिक शोषणाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम्. जे. अकबर यांनी शेवटी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यांच्यावर तब्बल १५ महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील वारकरी संप्रदाय आणि संतमहंत श्रीराममंदिर उभारणीच्या कार्यात सहभागी होणार ! – ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज कोल्हापूरकर

राममंदिर उभारणीचा विसर पडलेल्या भाजप सरकारवर आमचा विश्‍वास राहिला नाही. आता शिवसेनाच प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारू शकते, यात तीळमात्र शंका नाही. विजयादशमीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा…..

सार्वजनिक शौचालयांतील अपुर्‍या पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय

गेल्या १०-१२ दिवसांपासून पुरेशा पाण्याअभावी नागरिकांना अनेक ठिकाणी तुंबलेल्या सार्वजनिक शौचालयांचा उपयोग करावा लागत आहे. शौचालयासाठी ‘पाणी हवे असेल, तर अधिक पैसे देणार का ?’, असा प्रश्‍न ‘पे अण्ड यूज’ प्रकारच्या सार्वजनिक शौचालयांचे ठेकेदार करत आहेत.

राजकीय पक्षांची होर्डिंग आणि फलक यांसमोर निवडणूक आयोग हतबल झाल्यामुळे उच्च न्यायालयाकडून आश्‍चर्य व्यक्त !

शहराशहरांत राजकीय पक्षांकडून होर्डिंग आणि फलक लावून कायद्याचा भंग केला जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करावा, असे निर्देश दिलेले असूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याविषयी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही.


Multi Language |Offline reading | PDF