मालदीवमध्ये चीन समर्थक राष्ट्रपती यामीन सत्ता सोडत नसल्याने अमेरिकेची कठोर कारवाईची धमकी

मालदीवमध्ये सत्तेवर असणारे चीन समर्थक राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला असतांनाही ते सत्ता सोडण्यास नकार देत आहेत. पुढील मासामध्ये नवीन राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलिह यांचा शपथविधी होणार आहे

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांचे शीर आणणार्‍याला १ कोटी रुपये देणार ! – उत्तरप्रदेशमध्ये ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’ची भित्तीपत्रके

गुजरातमध्ये एका १४ मासांच्या मुलीवर बिहारी मजुराने केलेल्या बलात्कारानंतर उत्तर भारतियांवर आक्रमणे होत आहेत. त्यांना राज्यातून पळवून लावण्यात येत आहे.

लोकलगाडीत युवतीसमोर अश्‍लील कृत्य करणारा पोलिसांच्या कह्यात

येथील पश्‍चिम रेल्वे मार्गावरील सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांच्या विरार-चर्चगेट लोकलगाडीने कुटुंबियांसह युवती घरी परतत होती. तिला पाहून अश्‍लील कृत्य करणार्‍या अविजीत उत्तम सिंग (वय २९ वर्षे) याला प्रवाशांनी चोप देत रेल्वे पोलिसांच्या कह्यात दिले.

कारागृहात गीता आणि उपनिषद वाचल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत होती ! – सुहैब इलियासी

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुहैब इलियासी यांची नुकतीच त्यांच्या हिंदू असलेल्या पत्नीच्या वर्ष २००० मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.

महिलेकडून शरीरसुखाच्या मागणीसाठी दबाव आल्याच्या कारणावरून तरुणाची आत्महत्या

एका महिलेकडून सतत शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते की, ‘या महिलेने माझे आयुष्य बरबाद केले आहे.

मुंबई येथे बालकांची तस्करी केल्याप्रकरणी ४ धर्मांधांसह एकाला अटक

कारखाने आणि छोट्या छोट्या युनिटमध्ये काम करण्यासाठी बालकांची तस्करी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सादिक मन्सुरी, सुकेश्‍वर राऊत, एकलाक हसन, जाफर शेख, अब्दुल शेख यांना १३ ऑक्टोबर या दिवशी मुलुंड येथे अटक केली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पैसे घेऊन उपचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील ३४ रुग्णालयांवर कारवाई

राज्यातील दारिद्य्र रेषेखालील आणि शेतकरी कुटुंबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा प्रारंभ केला; मात्र जिल्ह्यातील रुग्णालयात ही योजना विनामूल्य असतांनाही अनेक रुग्णांकडून पैसे घेतले जात आहेत.

पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांवर कारवाई करा ! – धनंजय मुंडे

छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक लिखाण असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची क्षमा मागून राजीनामा दिला पाहिजे

डबलडेकर लोकल चालू करणे शक्य आहे का ? – उच्च न्यायालयाचा रेल्वेला प्रश्‍न

लोकलगाड्यांमधील गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने डबलडेकर लोकलगाडी चालू करणे शक्य आहे का ?, असा प्रश्‍न न्यायालयाने रेल्वेला केला.

खोटे गुन्हे मागे न घेतल्यास २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला दुचाकी आणि चारचाकी यांचा घेराव घालण्याची मराठा क्रांती मोर्च्याची चेतावणी !

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या नियोजनात असलेल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात नोंदवलेले खोटे गुन्हे मागे न घेतल्यास २७ ऑक्टोबर या दिवशी मंत्रालयाला दुचाकी आणि चारचाकी यांचा घेराव घालण्याची चेतावणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF