नवरात्रोत्सव (आज अष्टमी)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

दिनविशेष : हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’ चा वर्धापन दिन !

आज हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’ चा वर्धापन दिन !

(म्हणे) ‘आतंकवादी मन्नान वानी हिंसाचारातील पीडित !’ – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमध्ये मन्नान वानी या आतंकवाद्याला भारतीय सुरक्षादलाने ठार केले. या पार्श्‍वभूमीवर पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंटच्या नेत्या आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी वानी हा काश्मीरमधील हिंसाचारातील पीडित असल्याचे वक्तव्य केले आहे

काँग्रेसकडून काश्मीरविना भारताचा नकाशा प्रसारित : गुन्हा नोंद !

भारताचा नकाशा काश्मीरविना प्रसारित केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड भाजपने काँग्रेसच्या विरोधात तक्रार दाखल प्रविष्ट केली.

देहलीत गोवंशाच्या हत्येनंतर तणाव : धर्मांध युवकाला अटक !

येथील नंदनगरी भागातील एका घरात गोवंशाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला. या घटनेविषयी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा मारून उबेर वहाबी या २८ वर्षीय धर्मांध युवकाला अटक केली

हिंदुद्वेषी संघटनेच्या सनातनविरोधी ‘ट्विटर ट्रेंड’चा फज्जा !

ट्विटर या सामाजिक माध्यमावर सनातन संस्थेला कथित उघडे पाडण्यासाठी १६ ऑक्टोबरला ‘ट्रेंड’ चालू करण्याचे सनातनद्वेष्ट्यांनी घोषित केले होते. त्यानुसार या दिवशी सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांवर बिनबुडाचे आरोप करून ….

पोलिसांनी महंत आणि पुजारी यांना प्रवेश रोखल्याने ऐन नवरात्रोत्सवात श्री भवानीदेवीच्या पूजेला अर्धा घंटा विलंब !

ऐन नवरात्रोत्सवात पोलिसांनी श्री भवानीदेवी मंदिरातील छत्रपती शिवाजी द्वार बंद केल्याने १५ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी देवीच्या अभिषेक पूजेला अर्धा घंटा विलंब झाला.

भारतात २ लाख ५० सहस्र अवैध मदरशांना इस्लामी राष्ट्रांतून निधी प्राप्त !

भारतात आतंकवाद्यांकडून मिळणार्‍या निधीविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा चौकशी करत आहे. हरियाणातील पलवल येथील मशीद बांधण्यासाठी लष्कर-ए-तोयबा निधी पुरवत असल्याचे समोर आले आहे.

(म्हणे) ‘रावणदहन करणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट करा !’

रावण हा संगीततज्ञ, राजनीतीज्ञ, शिल्पकार, नीतीतज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी इत्यादी अनेक गुणांचा आविष्कार असणारा राजा होता. प्रथेच्या नावाखाली कुणी रावणदहनासारखा प्रकार केल्यास आदिवासी संघटना आणि एकंदरीत समाजाच्या भावना तीव्र होतील.

पुणे येथे जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ असलेल्या ठिकाणी झारखंड सरकारने पर्यटन चालू केल्याने त्या ठिकाणी अनेक उपाहारगृहांना पर्यायाने मांसाहाराला अनुमती मिळणार असल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF