नवरात्रोत्सवात नकारात्मक वृत्तांकन केले न जाण्यासाठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर मंदिर प्रशासनाकडून निर्बंध !

‘एका शहरातील सरकारीकरण झालेल्या एका प्रसिद्ध मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जातात; मात्र या प्रतिनिधींकडून मंदिर प्रशासनाकडून शपथपत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे.

शंकराचार्यांच्या शाहीस्नानाने महापर्वकाळास प्रारंभ : शिंगणापूर येथे भाविकांची गर्दी

११ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी गंगा पंचगंगेच्या प्रवाहात अवतीर्ण झाली. १२ ऑक्टोबरला विशालतीर्थ घाटावर (शिंगणापूर) शंकराचार्यांचे शाहीस्नान, गंगापूजन, तसेच अन्य धार्मिक विधी होऊन महापर्वकाळास प्रारंभ झाला.

सामाजिक माध्यमांवर भावनिक ‘स्टेटस’ ठेवणार्‍या मुलींना लक्ष्य करून त्यांचे शोषण केले जाते ! – सर्वेक्षण

सामाजिक माध्यमांवरून भावनिक ‘स्टेटस’ला (चित्र, विचार आदींद्वारे स्वतःची प्रतिमा दर्शवणे) प्रतिसाद देणार्‍या मुलींना लक्ष्य करण्यात येते आणि त्यातून पुढे त्यांचे शोषण केले जाते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर केरळमधील श्री जटाधारी देवस्थानमधील आचारांमध्ये पालट

येथील पड्रे गावातील श्री जटाधारी देवस्थानात मुक्त प्रवेशासह काही आचार आणि अनुष्ठान यांत पालट करण्यात आला आहे. या आधी देवस्थानात काही जातींच्या लोकांना थेट अर्पण देऊन प्रसाद घेण्यास निर्बंध होते.

छद्म पुरोगाम्यांचा बुुरखा पांघरलेेल्यांचे पितळ उघडे करणे आवश्यक ! – वैद्य परीक्षित शेवडे, व्याख्याते आणि लेखक

खरे हे खर्‍या पद्धतीने न मांडता खोट्याचे बाजारीकरण करणारे असे जे मुठभर पत्रकार आहेत ते जमात-ए-पुरोगाम्यांचा एक भाग आहेत.

गोवा भाजपचे संकेतस्थळ पाकिस्तान्यांनी ‘हॅक’ करून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिले

गोवा भाजपचे ‘गोवाबीजेपी डॉट ओआर्जी’ हे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी ‘हॅक’ केले. हा प्रकार १५ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता लक्षात आला.

(म्हणे) ‘सरकार सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी कधी घालणार ?’ – अजित पवार

काय चालू आहे राज्यात ? पत्रकारांना सरळसरळ धमक्या दिल्या जात आहेत. सनातन संस्थेवर कारवाई का नाही ? आमच्या काळात आम्ही बंदीचा प्रस्ताव पाठवला होता; पण सरकार आता काय करत आहे ? देवेंद्र फडणवीस सरकार संस्थेवर कायमस्वरूपी बंदी कधी घालणार ? कसली वाट बघताय ? असे बोलघेवडे प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी ‘ट्वीट’ करून केले आहेत.

दीपावलीच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

‘साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनात साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

गंगापुत्रांचे मारेकरी !

गंगानदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी १११ दिवस उपोषण करणारे प्रा. जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद आज आपल्यात नाहीत. एवढे दिवस प्रदीर्घ आंदोलन करूनही त्यांच्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत. आता त्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF