केंद्रीय राज्यमंत्री एम्.जे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होईल ! – अमित शाह

‘मी टू’ (मीसुद्धा) या अभियानाच्या अंतर्गत परराष्ट्र राज्यमंत्री आणि पत्रकार एम्.जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल.

प्रा. जी.डी. अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी पंतप्रधानांसह नितीन गडकरी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवा !

गंगा नदी स्वच्छतेच्या मागणीसाठी ज्येष्ठ पर्यावरणवादी जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद यांनी १११ दिवस उपोषण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अग्रवाल यांच्या मृत्यूच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती उत्तरदायी आहेत

पुणे येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने लेखक आणि प्रकाशक यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

‘सर्व शिक्षा अभियाना’तील समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे लिखाण केल्याच्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने लेखक आणि प्रकाशक यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

ज्ञान-विज्ञान समितीची कर्नाटकातील हासनंबादेवीच्या मंदिरातील चमत्कारांचे विश्‍लेषण करण्यासाठी बैठक

हासन जिल्ह्यातील ज्ञान-विज्ञान समितीने येथील ऐतिहासिक हासनंबादेवीच्या मंदिरात घडणार्‍या चमत्कारांची जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी, यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

राममंदिराचा निर्णय न्यायालयच घेणार असेल, तर भाजपसमवेत का रहायचे ? – रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास

राममंदिराच्या सूत्रावर भाजपने निवडणूक जिंकली आणि आता मंदिराचे सूत्र न्यायालयात असल्याचे कारण देत मंदिर उभारण्याविषयी भाजप चालढकलपणा करत आहे.

‘रावण दहन’ हवेच !

‘रावण हा गोंड राजा होता. त्याने सीतेचा शीलभंग केला नाही, केवळ त्याची बहीण शूर्पणखा हिला केलेल्या शिक्षेचा सूड घेण्यासाठी त्याने सीतेला पळवले. तो प्रकांडपंडित, दानशूर, पराक्रमी होता. तरीही तो राक्षस होता, त्याला दहा तोंडे होती, असे त्याचे चुकीचे चित्र रंगवले जाते.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रकांची (‘फोटो कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे.

गायींच्या संगोपनासाठी ‘गाव तेथे गोशाळा’ उपक्रम राबवणार ! – महादेव जानकर, पशूसंवर्धनमंत्री

भारतीय संस्कृतीत गायीला पवित्र मानले जाते. गायीचे दूध, गोमूत्र यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. याशिवाय गायीच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो.

दादर येथील श्री कालिकामाता सेवा मंडळाचा दुकानदार आणि फेरीवाले यांच्याकडून वर्गणी जमा न करण्याचा स्तुत्य निर्णय

दादर पूर्व भागातील श्री कालिकामाता सेवा मंडळाने या वर्षीपासून विभागातील कोणत्याही दुकानदार आणि फेरीवाले यांच्याकडून वर्गणी जमा न करण्याचा  निर्णय घेतला आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी रामनाथी आश्रमात तिसरा पंचमुखी हनुमानकवच यज्ञ संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी संकल्पित ५ ‘पंचमुखी हनुमानकवच यज्ञां’पैकी तिसरा यज्ञ १४ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात संपन्न झाला. पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात यज्ञविधी पार पडले.


Multi Language |Offline reading | PDF