महाराष्ट्र सरकार घरपोच मद्य पोहोचवण्याची योजना चालू करण्याच्या सिद्धतेत !

दारू हवी असणार्‍यांना ती घरपोच देण्याची नवी योजना राज्यात चालू करण्याचा विचार राज्यशासन करत आहे, असे प्रतिपादन उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

लवकरच ‘अलाहाबाद’चे नाव पालटून ‘प्रयागराज’ असे नामकरण करणार ! – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशातील ‘अलाहाबाद’ जिल्ह्याचे पुन्हा नामांतर करून त्याचे प्राचीन नाव ‘प्रयागराज’ हे ठेवण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली.

घरवापसीसाठी प्रयत्न करणार्‍या न्यायाधिशाच्या पत्नीची धर्मांतरित ख्रिस्ती सुरक्षारक्षकाकडून हत्या

येथे १३ ऑक्टोबरला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कृष्णकांत यांची पत्नी रितू आणि त्यांचा मुलगा ध्रुव यांच्यावर त्यांचा पोलीस सुरक्षारक्षक महिपाल यादव याने भर रस्त्यात चारचाकी गाडीमध्येच सरकारी बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

(म्हणे) ‘सनातन संस्थेला उघडे पाडण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून ट्विटर ट्रेंड चालू करणार !’ – सनातनद्वेषी आणि धर्मांध यांची चळवळ

येत्या १६ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजल्यापासून सनातनद्वेषी आणि धर्मांध ट्विटरवरून सनातन संस्थेला उघडे पाडण्यासाठी ‘ट्रेंड’ चालू करणार आहेत. ही माहिती त्यांनी ट्विटरवरून चालू केली आहे…..

चर्चासत्राच्या वेळी हिदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणार्‍या ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीच्या निवेदिका निखिला म्हात्रे !

२० ऑगस्ट या दिवशी ‘टिव्ही ९’ या वृत्तवाहिनीवर ‘आखाडा’ या कार्यक्रमात ‘सनातनमुळे हिंदु धर्माची बदनामी होत आहे का ?’ या विषयावर घेण्यात आलेल्या चर्चेत निवेदिका निखिला म्हात्रे …..

(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे

‘सनातनची बॉम्ब फॅक्टरी’ सापडल्यानंतर त्यांच्यावरील ‘फोकस’ दूर करण्यासाठी या ५ कार्यकर्त्यांना (नक्षलप्रेमींना) अटक करण्यात आली. सनातनला वाचवण्यासाठी सरकार हे करत आहे. तुम्ही ‘सीमी’वर बंदी घालता, डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालता.

शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या करू ! – केरळमधील शिवसेनेची चेतावणी

येत्या १७ आणि १८ ऑक्टोबरला आमच्या महिला शिवसैनिक पांबा नदीच्या किनारी विरोध करण्यासाठी एकत्र येतील. कुठल्याही महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या महिला कार्यकर्त्या सामूहिक आत्महत्या करतील

रावणाविषयी पाठ्यपुस्तकातून शिकवण्याची मागणी करणे सर्वथा अयोग्य ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

एका संघटनेने रावणाविषयी पाठ्यपुस्तकातून लिखाण शिकवण्याची मागणी केली. रावणाची महिलांकडे बघण्याची दृष्टी चांगली नव्हती. असा आदर्श आपण समाजासमोर ठेवू शकत नाही. त्यामुळे रावणाविषयी पाठ्यपुस्तकात शिकवण्याची मागणी करणे सर्वथा अयोग्य आहे.

गुजरातमध्ये बिहारी तरुणाची हत्या

गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाच्या मूळच्या बिहारमधील तरुणावर १२ ऑक्टोबरच्या रात्री कामावरून घरी परतत असतांना अज्ञातांनी लोखंडी सळीने आक्रमण करून त्याची हत्या केली.

भारतीय चित्रपटांवर बंदी घाला ! – पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेची मागणी

जर भारतात पाकिस्तानचे चित्रपट प्रदर्शित होत नसतील, तर मग पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करायला का अनुमती द्यावी ? पाकिस्तानी चित्रपटसृष्टीचा विकास करायचा असेल, तर भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात पूर्णपणे बंदी घालायलाच हवी


Multi Language |Offline reading | PDF