केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून आज पुजारी आणि राजपरिवार यांच्या बैठकीचे आयोजन

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिल्यानंतर केरळ राज्यात ठिकठिकाणी हिंदूंकडून उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्यात येत आहे.

शाकाहारामुळे माझा खेळ सुधारला ! – विराट कोहली

गेल्या ४ मासांत मांसाहार न करता शाकाहार केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी म्हटले आहे. ‘सध्या प्रोटीन शेक आणि पालेभाज्या हा आहार घेत आहे.

काश्मीरमध्ये ३०० आतंकवादी सक्रीय, तर २५० घुसखोरीच्या सिद्धतेत !

८ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमध्ये होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या एक दिवस आधी घातपात करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होण्याची शक्यता आहे, असे सैन्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

न्यायालयांनी धार्मिक श्रद्धांविषयी निर्णय घेतांना धार्मिक परंपरांना लक्षात घ्यावे ! – अरुण जेटली

न्यायालयाने धार्मिक श्रद्धांच्या संदर्भात निर्णय घेतांना सर्व धार्मिक परंपरा विचारात घेतल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलतांना व्यक्त केले.

५ राज्यांतील विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित

देशातील राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिझोराम आणि तेलंगण या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि मिझोराम या ४ राज्यांमध्ये……

बलिया (उत्तरप्रदेश) येथे भारतमाता की जय म्हणणार्‍या विद्यार्थ्यांना मुसलमान शिक्षकाकडून शिक्षा

येथील गांधी महंमद अली मेमोरियल शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ‘भारतमाता की जय’ म्हटल्यावर शाळेतील मुसलमान शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात, अशी घटना समोर आली आहे. या प्रकरणी काही चित्रफिती सामाजिक माध्यमातून….

चीनने इंटरपोलच्या अध्यक्षांना चौकशीसाठी कह्यात घेतले

आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोलचे) अध्यक्ष मेंग हाँगवेई यांना चीनने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. यापूर्वी ते फ्रान्समधून चीनकडे जात असतांना बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

कॅथल (हरियाणा) येथे बलात्काराच्या प्रकरणी ७ पोलिसांसह १८ जणांवर गुन्हा नोंद

येथे मुलगी आणि तिची आई यांच्यावर बलात्काराच्या प्रकरणी १८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात एक साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ७ पोलीस कर्मचारी आहेत.

पहिल्या पतीला सोडून मुसलमान वाहनचालकाशी विवाह करणार्‍या हिंदु महिलेची त्याच्याकडून हत्या

हिंदु पतीला सोडून मुसलमान तरुणाशी विवाह करणार्‍या महिलेचा याच तरुणाने हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.


Multi Language |Offline reading | PDF