काश्मीरविषयी भारताने चुका केल्या आहेत ! – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक

काश्मीरविषयी भारताने चुका केल्या आहेत. या चुकांमुळे काश्मीर खोर्‍यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते, असे वक्तव्य राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे.

मुंगेर (बिहार) येथे आतापर्यंत २० एके ४७ रायफली आणि त्यांचे ५०० सुटे भाग जप्त

२९ ऑगस्टला एका हत्यारांच्या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालवलेल्या शोधमोहिमेतून आतापर्यंत २० एके ४७ रायफली आणि त्यांचे ५०० सुटे भाग जप्त केले आहेत.

श्री दुर्गादेवीला मासिक पाळी असल्याचे दर्शवलेले चित्र काढणार्‍याच्या विरोधात तक्रार

अनिकेत मित्रा नावाच्या एका चित्रकाराने श्री दुर्गादेवीचे चित्र काढून त्यावर एक ‘सॅनिटरी नॅपकीन’ आणि लाल रंगाचे गुलाबपुष्प यांचे चित्र रंगवले. हे चित्र फेसबूक या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होताच काही हिंदुत्वनिष्ठांनी कोलकाता येथे पोलिसांकडे तक्रार केली.

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांच्या संपर्काच्या वेळी मान्यवरांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्या नागपूर येथील २३ ते २५ सप्टेंबर २०१८ या वास्तव्याच्या काळात शहरातील विविध धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, व्यावसायिक यांच्याशी संपर्क केले.

श्री कांचीपूरम् येथील कांची मठात मराठी भाषेतून भागवत सप्ताह होणार !

शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी, शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती आणि पीठाधिपती शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने श्री शंकर मठ कांची पीठ येथे मराठी भाषेतून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे येथील कालवा फुटीच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट !

खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालवा फुटीच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात २ स्वतंत्र जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आल्या असून या याचिकांवरील पुढील सुनावणी ५ ऑक्टोबरला होणार आहे.

आटपाडी तहसील कार्यालयातील उपलेखापाल शमशाद रफिक तांबोळी यांना लाच घेतांना अटक !

आटपाडी तहसील कार्यालयातील उपलेखापाल शमशाद रफिक तांबोळी यांना ४ ऑक्टोबर या दिवशी पाच सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले. या संदर्भात एका शेतकर्‍याने लाचलुचपत खात्याकडे गार्‍हाणे दिले होते.

तरुणीचे अश्‍लील ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यमांवर टाकणार्‍या धर्मांधाला मुंबई विमानतळावर अटक !

तरुणीची अपकीर्ती करण्यासाठी तिचे गुपचूप केलेले अश्‍लील ध्वनीचित्रीकरण समाजमाध्यमांवर टाकून अपकीर्त केल्याप्रकरणी एजाज अहमद खान उपाख्य आर्यन या धर्मांधाला येथील विमानतळावर उतरताच पोलिसांनी अटक केली.

अमरावती येथे १ लाख ७९ सहस्र रुपयांची वीजेची चोरी करणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद

शहरातील अलीमनगरमध्ये १ लाख ७९ सहस्र रुपयांची वीजेची चोरी केल्याच्या प्रकरणी अहमद बेग कादर बेग (वय ६० वर्षे) या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात महावितरणची वीजेची चोरी करणार्‍यांचा शोध घेण्याची मोहीम चालू आहे.

पशूवधगृहात नेत असलेल्या जनावरांना पोलिसांनी पकडले

पशूवधगृहात नेत असलेल्या जनावरांना बल्लारपूर पोलिसांनी नाकाबंदी करून पकडले. दोन आरोपींना अटक करण्यात आली. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी गाड्या अडवून झडती घेतली असता त्यात ४ बैल आढळून आले. ते कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात नेत होते.


Multi Language |Offline reading | PDF