भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा !

विश्‍व हिंदु परिषदेच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीमध्ये साधू आणि संत यांनी केंद्रातील भाजप सरकारने राममंदिर उभारण्याविषयी अध्यादेश काढावा, अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला.

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेकडून केरळ उच्च न्यायालयात आव्हान

केरळच्या शबरीमला येथील अयप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्या ….

मिदनापूर (बंगाल) येथे पोलिसांवर बॉम्ब फेकून त्यांच्या कह्यातून दोघा आरोपींचे पलायन

येथे ३ आरोपींनी पोलिसांच्या कह्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना पोलिसांवर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रयत्नात तिघेही पळून गेले; मात्र नंतर एकाला पोलिसांनी परत अटक केली.

स्थानिकांकडून उत्तर भारतियांना गुजरात सोडण्याची धमकी

येथे २८ सप्टेंबर या दिवशी १४ मासांच्या मुलीवर बिहारच्या एका मजुराने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात स्थानिक गुजराती लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.

प्रयाग येथे कुंभपर्वासाठी जाणार्‍या प्रवासी भाविकांवर रेल्वेकडून अधिभार !

पुढील वर्षी जानेवारी मासामध्ये येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेने येणार्‍या भाविकांकडून १० ते ४० रुपये अधिभार घेण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या कालावधीत हा अधिभार द्यावा लागणार आहे.

अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता भारताचा रशियासमवेत ‘एस्-४००’ खरेदी करार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देहलीतील हैद्राबाद हाऊसमध्ये ५ ऑक्टोबरला बैठक झाली. यात भारताने  अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून ४० सहस्र कोटी रुपये देऊन ५……

भाजप सरकारचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार !

‘स्वच्छ भारत अभियान’ हा सरकारचा एक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार (पब्लिसिटी स्टंट) आहे, अशी टीका भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी स्वपक्षावर केली आहे.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘सिग्नल तोडणे हा गुन्हा आहे, मद्य पिऊन गाडी चालवणे हा गुन्हा आहे, विनयभंग हासुद्धा गुन्हा ठरत आहे; मात्र उघड उघड व्यभिचार हा गुन्हा नाही.’ – श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना. (सामना, २९.९.२०१८)            

वाराणसी येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्यावरून चर्चची तोडफोड

येथे सेंट थॉमस चर्चची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पाद्री एन्. स्टीव्हन यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.

भाजप सरकारच्या काळात खासदारांच्या वेतन आणि भत्ते यांवर १ सहस्र ९९७ कोटी रुपये खर्च

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून आतापर्यंत खासदारांचे वेतन आणि भत्ते यांसाठी १ सहस्र ९९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारातून चंद्रशेखर गौड यांनी ही माहिती मिळवली आहे. या माहितीवर अद्याप कुठल्याही खासदाराने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF