हिंदु भाविकांकडून त्रावणकोर देवस्वम् मंडळाच्या मंदिरांत अर्पण न करण्याचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. त्याविरुद्ध फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यास त्रावणकोर देवस्वम् मंडळाने नकार दिल्याने हिंदु भाविक संतप्त झाले आहेत.

कोलकात्यामध्ये मौलवींकडून त्यांचे मानधन १० सहस्र रुपये करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी राज्यातील दुर्गापूजा उत्सव साजरा करणार्‍या मंडळांना २८ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यातील मौलवींनी रस्त्यावर उतरून आंदोलन चालू केले आहे.

भाजपने राममंदिर बांधले नाही, तर त्याच्या विरोधात निवडणूक लढवणार ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

जर अजूनही भाजपने अयोध्येत राममंदिराचे बांधकाम चालू केले नाही, तर वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करू, अशी चेतावणी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संस्थापक ….

शिवसेनेच्या प्रयत्नांशिवाय अयोध्येतील राममंदिराचा शिलान्यास अशक्य ! – जनमेजयशरणजी महाराज, रामजन्मभूमी न्यासप्रमुख

शिवसेनेच्या प्रयत्नांविना अयोध्येतील राममंदिराचा शिलान्यास अशक्य आहे, असे मत रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख जनमेजयशरणजी महाराज यांनी व्यक्त केल्याची माहिती शिवसेना खासदार श्री. संजय राऊत यांनी दिली.

बारामती नगर परिषदेने गणेशमूर्तींचे परस्पर घाईघाईत विसर्जन केले !

येथील नगर परिषद आणि ‘एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ यांनी दान घेतलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन न करता त्यांची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने त्या कचर्‍याच्या गाडीतून कचरा डेपोमध्ये नेल्या होत्या.

भारताने ७ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना परत पाठवले

आसाममध्ये अवैधरित्या रहाणार्‍या ७ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना भारताने ४ ऑक्टोबर या दिवशी मणीपूर येथील मोरेह सीमा चौकीवर म्यानमारच्या अधिकार्‍यांकडे सोपवले.

अधिकोष (बँक) कर्मचारी असल्याचे सांगून भ्रमणभाषवर डेबीट कार्ड, आधार कार्ड आणि ओ.टी.पी. (OTP) क्रमांक मागणार्‍या अज्ञात व्यक्तींपासून सावधान !

सध्या अनेक नागरिकांना अज्ञात व्यक्तींकडून भ्रमणभाष येत आहेत. या अज्ञात व्यक्ती स्वतः अधिकोष (बँक) कर्मचारी असल्याचे भासवतात आणि नागरिकांची फसवणूक करतात, असे लक्षात आले आहे.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘देशात भाजपचे राज्य आल्यापासून हे काय घडू लागले आहे ? भ्रष्टाचाराला उघड मान्यता मिळालीच आहे. आता अनैतिकतेवरही फुले उधळली जात आहेत.’ – श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना. (सामना, २९.९.२०१८)

हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी ५ सहस्र अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक ! – मनोज खाडये

सध्याच्या काळात विविध घटनांमधूनहिंदुत्वाचे कार्य करणार्‍या कायकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे, असेच दिसते. अशा खच्चीकरण झालेल्या हिंदुत्वनिष्ठांसाठी अधिवक्त्यांनी संरक्षण कवच म्हणून कार्य करणे आवश्यक आहे.

किडनी प्रत्यारोपण शस्त्रकर्मासाठी ८० सहस्र रुपयांची लाच घेणारे कह्यात

किडनी प्रत्यारोपण शस्त्रकर्माच्या कायदेशीर अनुमतीसाठी ८० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जे.जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षकांसह दोघांना १ ऑक्टोबरला कह्यात घेतले आहे.


Multi Language |Offline reading | PDF