हिंदूंवर अत्याचार करणार्‍या बांगलादेशावर आक्रमण करून तो कह्यात घ्या ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणे चालूच रहात असतील, तर भारताने बांगलादेशावर आक्रमण करून त्याला स्वतःच्या कह्यात घेतले पाहिजे, अशी मागणी भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 

‘विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नसल्यामुळे तू मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाही’, असे पतीने म्हटल्यामुळे पत्नीची आत्महत्या !

व्यभिचार आता गुन्हा राहिलेला नाही. त्यामुळे तू मला विवाहबाह्य संबंध ठेवण्यापासून रोखू शकत नाही, असे पती जॉन पॉल फ्रँकलिन (वय २७ वर्षे) यांनी म्हटल्यानंतर धक्का बसलेल्या पत्नी पुष्पलता (वय २४ वर्षे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथील एम्जीआर् नगर येथे २९ सप्टेंबर या दिवशी घडली.

मुख्य न्यायालये धर्मशास्त्राच्या विरोधात कृती करत आहेत !- शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

देशातील मुख्य न्यायालये धर्माची उपेक्षा करून धर्म बिघडवण्याचे काम करत आहेत. न्यायालये धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन कृती करत आहेत, असे विधान द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे आयोजित केलेल्या धर्मसभेत केले.

खर्‍या भक्त असणार्‍या महिला नव्हे, तर केवळ ‘महिला कार्यकर्त्या’ शबरीमला मंदिरात येतील ! – पद्मकुमार, अध्यक्ष, त्रावणकोर देवस्वम् मंडळ

भगवान अय्यप्पाच्या ‘खर्‍या महिला भक्त’ शबरीमला मंदिराला भेट देण्याची शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ ‘महिला कार्यकर्त्या’ या मंदिरात येतील, असे या मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या त्रावणकोर देवस्वम् मंडळाचे अध्यक्ष पद्मकुमार यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविक यांना दर्शन घेता येणार नाही !  

येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी आल्यास त्यांना देवीचे दर्शन घेता येणार नाही, असा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

पू. भिडेगुरुजी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय !

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावरील ७ जून २०१७ पासून १४ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे आणि शिवसेना अन् भाजप यांचे नेते यांच्यावरील काही गुन्हे मागे घेण्यात आल्याचे समजते. पू. गुरुजींसमवेत शेकडो कार्यकर्त्यांच्या विरोधातील गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अमृतसर येथे युवक काँग्रेसच्या नेत्याला अमली पदार्थासहित अटक

येथील युवक काँग्रेसचा नेता गुरइकबालसिंह रूपा याला ‘हेरोइन’ या अमली पदार्थासहित अटक करण्यात आली आहे.

अंबरनाथ येथील नागरिकांची ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्स्फूर्तपणे निषेधफेरी

कल्याण येथील बुवापाडा परिसरात रहाणार्‍या १६ वर्षीय हिंदु धर्मीय मुलीला तिच्याच परिसरात रहाणारा धर्मांध मजीद अब्दुल अजीज खान याने फूस लावून पळवून नेले होते. नंतर ती मुलगी संशयास्पदरित्या मृत अवस्थेत आढळली होती.

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या निर्णयाविषयी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी ‘दैनिक सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केलेले परखड विचार येथे प्रतिदिन देत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF