साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्रीनिधीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय !

साईबाबा संस्थानने मुख्यमंत्रीनिधीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यांतील ३० कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी, तर २० कोटी रुपये मुख्यमंत्री फंडात दुष्काळ निवारणासाठी देण्यात येणार असल्याचे कळते.

एन्.आय.ए.कडून साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह ७ जणांवर आरोप निश्‍चित

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यासह ७ जणांवर आतंकवादी कट आणि हत्येचा ठपका ठेवून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात ……

राजदचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याची जन्मठेप कायम

बिहारमधील सिवान येथे वर्ष २००४ मध्ये दोन भावांना अ‍ॅसिडमध्ये बुडवून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार आणि नामचीन गुंड महंमद शहाबुद्दीन याला देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा, तर दूरदर्शन वाहिनीच्या छायाचित्रकाराचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा झाले, तर दूरदर्शन वाहिनीच्या एका छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. विधानसभेची निवडणूक तोंडावर असतांना नक्षलवाद्यांनी दंतेवाडाच्या अरनपूर भागात दूरदर्शन वाहिनीच्या चमूवर आक्रमण केले.

फटाके फोडण्यासाठी २ घंटे कुठले असावेत, हे ठरवण्याची राज्यांना मुभा !

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्‍चित केली होती; मात्र न्यायालयाने आता यात पालट केला असून फटाके फोडण्यासाठीचे २ घंटे कुठले वापरायचे, ते ठरवण्याची मुभा राज्यांना दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ठाणे जिल्ह्यातील सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या धर्मकार्यामधील धर्मप्रेमींचा सहभाग !

उल्हासनगर येथील श्री. अनिल जयस्वाल यांनी त्यांच्या इमारतीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धर्मशिक्षण देणार्‍या फ्लेक्सचे प्रदर्शन लावण्यासाठी आणि प्रवचनाचे आयोजन करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची भेट घालून दिली.

‘नेटफ्लिक्स’ या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्या युवकाच्या प्रेयसीचा निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न

वाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपट स्मार्टफोनवर पहाण्यासाठी उपयोग करत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्या युवकाच्या प्रेयसीने तिच्याकडे युवकाचे दुर्लक्ष होत असल्याने निराश होऊन आईच्या झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

अकोट (अकोला) येथे ८५० किलो गोवंशाचे मांस जप्त

स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुर्‍यात पोलिसांनी २८ ऑक्टोबरला टाकलेल्या धाडीत १ लाख ७० सहस्र ९५ रुपयांचे ८५० किलो गोवंशाचे मांस आणि इतर साहित्य जप्त केले.


Multi Language |Offline reading | PDF