शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेशाचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे हे घटनाबाह्य आहे. प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याविषयीच्या याचिकेवर २८ सप्टेंबर या दिवशी दिला.

नक्षल समर्थकांच्या अटकेत मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून नजरकैदेत असणारे वरवरा राव, अधिवक्त्या सुधा भारद्वाज, अधिवक्ता अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील ! – देवेंद्र फडणवीस

नक्षल समर्थकांच्या अटकेत मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील’, असे त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.

वेळ येईल, तेव्हा स्वतः भगवान रामच स्वतःसाठी मंदिर बनवतील ! – उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

राममंदिर कुणाला बनवण्याची आवश्यकता नाही. वेळ येईल, तेव्हा स्वतः श्रीरामच त्यांच्यासाठी मंदिर बनवतील, असे विधान उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले.

उत्तराखंड उच्च न्यायालयाचा इंटरनेट सेवा पुरवणार्‍या आस्थापनांना अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा आदेश

उत्तराखंड उच्च न्यायालयाने ‘इंटरनेट’ सेवा पुरवणार्‍या आस्थापनांना अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारच्या वर्ष २०१५ च्या अधिसूचनेचे पालन करतांना यावर बंदी घालावी, असे या आदेशात म्हटले आहे.

शरद पवार यांनी रामायण आणि महाभारत यांविषयी केलेले भाष्य म्हणजे मूर्खपणाची परिसीमा ! – महंत रामगिरी महाराज, मठाधिपती, सरला बेट, नगर.

रामायण आणि महाभारत यांविषयी बेताल वक्तव्य करणारे शरद पवार यांची बुद्धी भरकटली आहे. पवार यांनी रामायण आणि महाभारत यांविषयी केलेले भाष्य म्हणजे मूर्खपणाची परिसीमा आहे, अशी खरमरीत टीका सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केली आहे.

४ वर्षांत एकदाही शिक्षणाचे भगवेकरण केले नाही ! – केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर

सत्तेवर आल्यापासून म्हणजेच मागील ४ वर्षांत शिक्षणाचे भगवेकरण एकदाही केले नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. ‘आम्ही गेल्या ४ वर्षांत इतिहासाचे एक पानही पालटले नाही.

बिहारमध्ये काँग्रेसने लावलेल्या फलकावर नवनियुक्त नेत्यांच्या छायाचित्राखाली लिहिली प्रत्येकाची जात !

बिहारमध्ये काँग्रेसने लावलेल्या एका फलकावर नवनियुक्त नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून त्याखाली प्रत्येकाची जातही लिहिली आहे. विशेष म्हणजे या फलकावर राहुल गांधी यांच्या छायाचित्राखाली त्यांची ‘ब्राह्मण’ अशी जात लिहिण्यात आली आहे.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करा ! – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

देशातील ६८ टक्के दुधात भेसळ होत असल्याचे केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सदस्य मोहनसिंग अहुवालीया यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने शासनाकडे केली आहे.

रेशनिंग दुकानातील अपप्रकाराविरोधात हरिविठ्ठल नगरवासियांची जळगाव येथील प्रशासनाकडे कारवाईची मागणी

शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरातील रेशनिंगच्या दुकानात चालणार्‍या अपप्रकारांविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांच्या वतीने रहिवासी श्री. संतोष पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. राहुल जाधव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.


Multi Language |Offline reading | PDF