सिलीगुडी (बंगाल) येथे माकपच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकार्‍याला जाळण्याचा प्रयत्न

येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्‍यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. (तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील अराजक ! जिथे पोलीसच असुरक्षित आहेत, तिथे जनतेचे रक्षण कसे होणार ? – संपादक) या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले.

आधारकार्ड वैधच; पण खासगी संस्था नागरिकांकडे आधारकार्ड  मागू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

घटनात्मकदृष्ट्या आधारकार्ड वैधच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यांच्या खंडपिठाने दिला. तथापि ‘कोणतीही खासगी संस्था नागरिकांकडे आधारकार्ड मागू शकत नाही, तसेच शाळा आणि महाविद्यालयेही आधारकार्डची सक्ती करू शकत नाहीत’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रहिताच्या प्रकरणांच्या सुनावणीचे आता थेट प्रक्षेपण होणार !

सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रहिताच्या प्रकरणांच्या सुनावणीचे यापुढे थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. ‘थेट प्रक्षेपणामुळे न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. लोकहिताच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे’, असे न्यायालयाने या वेळी नमूद केले.

(म्हणे) ‘सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुत्वाविषयीचा निर्णय चुकीचा !’ – डॉ. मनमोहन सिंह

नव्वदच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे.एस्. वर्मा यांनी हिंदुत्वाविषयी ‘हिंदुत्व ही जीवन जगण्याची कला आहे’, हा दिलेला निर्णय दोषपूर्ण होता, अशी मुक्ताफळे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वांत अयशस्वी समजले जाणारे काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी उधळली.

सनातन संस्था अध्यात्मप्रसाराचे महत्त्वाचे कार्य करत आहे ! – महापौर सौ. संगीता खोत

सनातन संस्था अध्यात्मप्रसाराचे महत्त्वाचे कार्य करत आहे. विरोधक काय म्हणतात, याकडे लक्ष न देता तुमचे कार्य नेटाने चालू ठेवा. गणेशोत्सवासह सर्व उत्सव आदर्श पद्धतीनेच साजरे होणे अपेक्षित आहे.

केरळमध्ये २ पाद्य्रांचा भाजपमध्ये प्रवेश !

केरळमध्ये २ पाद्री आणि एक ‘डेकॉन’ (चर्चमध्ये विविध काम करणार्‍या समितीचे सदस्य) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. केरळच्या ‘जॅकबाईट सीरियन चर्च’चे पाद्री जीवर्गीज किझाक्केदथ आणि थॉमस कुलाथुक्कल, तसेच ‘डेकॉन’ अ‍ॅण्ड्रूज मंगलाथ अशी यांची नावे आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये गरिबांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या कुलदीप यादव यास अटक

उत्तरप्रदेशमधील गरीब लोकांना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कुलदीप यादव यास पोलिसांनी  महाराजगंज जिल्ह्यातील लोहियानगर येथून अटक केली. त्याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘सर्जिकल स्ट्राईक’चे तुणतुणे वाजवत केले जाणारे राजकारण, हा सैनिकांचा अपमान ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

‘सर्जिकल स्ट्राईक’च्या दुसर्‍या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये सहभागी असलेला आमचा एक वीर सैनिक आतंकवाद्यांशी लढतांना हुतात्मा होत असेल, तर कसे व्हायचे ? आता ‘सर्जिकल स्ट्राईक’चा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा’

प्रभु श्रीराम माझ्या स्वप्नात आले आणि राममंदिर न झाल्यामुळे ते रडत होते ! – शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी

प्रभु श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते ते रडत होते; कारण अजूनही मंदिराची निर्मिती झालेली नाही. मंदिराची निर्मिती न झाल्याने केवळ रामाचे भक्तच नाहीत, तर स्वतः प्रभु श्रीरामही निराश झाले आहेत, असे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी म्हटले आहे.

सांडपाण्यामध्ये मूर्ती फेकून आणि कचर्‍याच्या गाडीतून मूर्ती नेऊन यवतमाळ नगरपालिकेने केली श्री गणरायाची घोर विटंबना !

यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जनाकरिता सिद्ध करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांतील गणेशमूर्ती शहरालगत असलेल्या सांडपाण्याच्या जलाशयांमध्ये फेकून श्री गणेशाची घोर विटंबना केली. या मूर्ती पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांनी फेकल्या.


Multi Language |Offline reading | PDF