गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याची विज्ञापने प्रसिद्ध करा आणि मगच निवडणूक लढवा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

. . . यामुळे आता भारतीय लोकशाहीत गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे किती जण आहेत, यावरून जगभरात भारताची छी थू होईल आणि त्यातून लोकशाही किती निरर्थक ठरली आहे, हे जगासमोर येईल !

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रुपये, तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रुपये मासिक वेतन !

तमिळनाडू राज्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील मशिदींमधील इमामांना काँग्रेस आणि जनता दल (ध.) सरकार ३ सहस्र १०० रुपये मासिक वेतन देते, तर बंगालमध्येही इमामांंना १० सहस्र रुपये मासिक वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी यांनी केली आहे. तरीही हे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून  घेतात !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे श्री चामुंडा मंदिरात घुसून धर्मांधांकडून तोडफोड

येथील चकबेगमपूर गावामध्ये उत्सवासाठी श्री चामुंडा मंदिराची स्वच्छता चालू असतांना काही धर्मांध तेथे आले आणि त्यांनी स्वच्छता रोखण्यास सांगितले. त्या वेळी वाद झाल्याने धर्मांधांनी मंदिरात घुसून तोडफोड केली.

आता देशाला, तसेच महाराष्ट्रालाही शरद पवार यांची आवश्यकता उरलेली नाही !

शरद पवार स्वत:ला नास्तिक म्हणवतात; मात्र ‘मुसलमानांच्या तीन तलाक या विषयासह अन्य सूत्रांवर त्यांच्या धर्मात कुणीही हस्तक्षेप करू नये’, असे म्हणतात; मग हिंदु धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार पवारांना कुणी दिला ? – पू. ह.भ.प. निवृत्ती वक्ते महाराज

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन अभियान’ १०० टक्के यशस्वी !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वाहतूक व्यवस्थापनामुळे संगममाहुली येथे विसर्जनासाठी भाविकांची पुष्कळ गर्दी होऊनही यंदा वाहतूककोंडी झाली नाही. त्यामुळे पोलीस आणि संगममाहुली ग्रामपंचायत यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले, तसेच अनेक भाविकांनी समितीचे आभार मानले.

बेंगळूरू येथील ‘वरसे इनोव्हेशन प्रा.लि. (डेली हंट)’, तिचे व्यवस्थापकीय संचालक आणि लेखिका यांना कायदेशीर नोटीस

सनातनची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी या अ‍ॅपचे मालक असलेले बेंगळूरू (कर्नाटक) येथील ‘वरसे इनोव्हेशन प्रा.लि. (डेली हंट)’ आस्थापन, तिचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र गुप्ता आणि या लेखाच्या लेखिका श्रीमती जयश्री इंगळे यांना सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

ठाणे आणि डोंबिवली येथे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्यासाठी जनप्रबोधन !

गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हिंदु धर्म संस्कृती जोपासत शास्त्रानुसार आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.

अमरावती येथील प्रबोधन कक्षाला मिळाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मनोभावे पूजा केलेली श्री गणेशमूर्ती पाण्यात फेकून देतात, हे पाहून फार वाईट वाटले. अशा व्यवस्थेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या.

फलटण (जिल्हा सातारा) येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास भाविकांकडून प्राधान्य

येथे अनंत चतुर्दशीला फलटण नगरपरिषदेने शहरात नीरा उजवा कालव्याजवळ यशवंतराव हायस्कूलच्या मैदानात आणि सांस्कृतिक भवन माळजाई मंदिराशेजारी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौदाची व्यवस्था केली होती.


Multi Language |Offline reading | PDF