बँकांची ५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून व्यापारी नितीन संदेसरा परदेशात पसार

उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यानंतर नितीन संदेसरा हा व्यापारी बँकांची ५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पसार झाल्याचे समोर आले आहे.

सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही ! – दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप, गोवा.

तथाकथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सनातन संस्थेला ‘क्लिन चीट’ दिली आहे. या अनुषंगाने मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.

गुजरातमध्ये प्रतिदिन २ महिलांवर बलात्कार होतो ! – गुजरात सरकारची माहिती

गुजरातमध्ये प्रतिदिन २ महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना घडतात, अशी माहिती समोर आली आहे. गुजरातची राजधानी कर्णावती (अहमदाबाद) येथे गेल्या वर्षी बलात्काराच्या ६२१ घटना घडल्या.

कुपवाडा (काश्मीर) येथे ३ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

काश्मीरमधील कुपवाडाच्या तंगधर येथे सुरक्षादलांनी घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत ३ आतंकवाद्यांना ठार केले; मात्र यात १ सैनिक हुतात्मा झाला.

शोपियां (काश्मीर) येथील गावातील एकमात्र हिंदु परिवारातील व्यक्तीची आतंकवाद्यांकडून हत्या

काश्मीरच्या शोपियांमधील गुंड या गावामध्ये एकमात्र असलेल्या हिंदु परिवारातील सदस्य कुलवंत सिंह यांची ३ दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली

मुंबईत गणेशोत्सव मंडपातील दानपेटी चोरणारा धर्मांध नागरिकांकडून पोलिसांच्या कह्यात !

सायन कोळीवाडा येथील एका गणेशोत्सव मंडपातील दानपेटी चोरणार्‍या अल्ताफ अलीम शेख उपाख्य मुस्तफा या धर्मांधाला पोलिसांनी कह्यात घेतले. दानपेटी घेऊन पळत असतांना त्याला येथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.

चिंचवड येथे निर्माल्य आणि श्री गणेशमूर्ती यांचे दान करण्याचा उपक्रम राबवून भाविकांची दिशाभूल !

चिंचवड येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी शासनपुरस्कृत धर्मद्रोह मोठ्या प्रमाणात घडला. रोटरी क्लब, लायन्स क्लब, संस्कार प्रतिष्ठान यांसह अनेकांनी मूर्तीदान, निर्माल्यदान उपक्रम राबवून शेकडो भाविकांकडून मूर्ती दान घेतल्या.

अनंत चतुर्दशीला मुंबई आणि पुणे यांसह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक अन् घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

लालबाग, गिरगाव, दादर आदी सर्वच उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ५ ते २५ फुटांपर्यंतच्या उंच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन अरबी समुद्रात करण्यात आले. या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळी ८ वाजता गणेशगल्लीचा राजा या मंडळाची मिरवणूक चालू झाली.

नेबापूर येथे ५२ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपति’ उपक्रम !

पन्हाळागडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावात सर्व ग्रामस्थ आणि तरुण मंडळे एकत्रित येऊन गेल्या ५२ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना राबवत आहेत. येथील उत्सवात लहान मुलांसमवेत वृद्ध आणि महिला यांचा सहभागही लक्षणीय असतो.


Multi Language |Offline reading | PDF