बेळगाव येथे कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला केलेली श्री गणेशाची वेशभूषा प्रबोधनानंतर काढली

येथील शिवाजी उद्यानासमोर असलेल्या ‘माने आर्ट्स’ या दुकानाचे मालक विजय माने यांनी प्रबोधनानंतर श्री गणेशाची वेशभूषा केलेला पुतळा काढून श्री गणेशाचे होणारे विडंबन थांबवले.

लहान मुले मातृभाषेपासून दुरावत आहेत ! – राज्यपालांकडून चिंता व्यक्त

पुढील २० ते ३० वर्षानंतर मुलांना मातृभाषेतून लिहिता आणि वाचता येऊ शकेल की नाही, अशी चिंताजनक परिस्थिती दिसत आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा, तसेच भारतीय भाषांमधून अधिक बालसाहित्य निर्माण करावे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी येथे केले.

नाशिक येथे शालिमार परिसरात श्री गणेशाचे घोर विडंबन

नाशिक येथे शालिमार परिसरातील गणेशोत्सव मंडळाने रस्ते स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या झाडूपासून सिद्ध कलेली ही गणेशमूर्ती म्हणजे श्री गणेशाचे घोर विडंबनच होय !

मिळकतधारकांकडून ३ पट दंडासहित घरपट्टी वसूल करणार ! – आयुक्त तुकाराम मुंढे यांची चेतावणी

महापालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या एकूण ३ लक्ष २७ सहस्र मिळकतींपैकी अनुमाने २ लक्ष ६९ सहस्र मिळकतींमध्ये अतिरिक्त बांधकाम आढळून आले. त्यामुळे ते अनधिकृत असल्याचा गौप्यस्फोट आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला.

दैनिक सनातन प्रभातसाठी आपण पाठवलेले लिखाण त्वरित प्रसिद्ध न होण्याची कारणे समजून घ्या !

‘अनेक साधक वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे आदी लिखाण दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबरला मतदान !

भुदरगड, करवीर तालुक्यांतील प्रत्येकी १, शिरोळ २, गडहिंग्लज आणि कागल तालुक्यांतील प्रत्येकी ३, चंदगडमधील ५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

साईनगर एक्स्प्रेसवर दरोडा

साईनगर एक्सप्रेसवर मनमाड-अंकाई दरम्यान २० सप्टेंबर या दिवशी रात्री आठच्या सुमारास आठ दरोडेखोरांनी रेल्वेत घुसून प्रवाशांना मारझोड करत महिला प्रवाशांचे ८ लाखांचे दागिने लुटले.

कोल्हापूर येथील सनातनचा साधक वैद्य प्रथमेश कोटगी याने सादर केलेल्या शोध प्रबंधास प्रमाणपत्र देऊन गौरव !

पणजी-गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्धक्यजनित विकारांवर असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत येथील सनातनचा साधक वैद्य प्रथमेश कोटगी  याने ‘अकाली वृद्धत्वाची कारणे’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला.


Multi Language |Offline reading | PDF